मुंबई : हा फोटो पाहून तुम्हीही चक्रावून जाल... कारण हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला तत्काळ आठवण होईल जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची... पण, हा टायगर श्रॉफ आहे असा जर तुमचा समज झाला असेल तर तुम्ही चूक आहात...
हा टायगर नाही तर याचं नाव आहे डेव्हिड सहारिया आहे... डेव्हिड आसामचा अभिनेता आणि मॉडेल आहे.
आपण काहीसे टायगर श्रॉफसारखे दिसतो याची जाणीव डेव्हिडलाही आहे... परंतु, तो स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.
टायगरच्या 'हिरोपंती' या सिनेमाची चर्चा सुरू असताना डेव्हिडनंही त्याच्याप्रमाणेच आपले केस वाढवून त्याचा लूक धारण केला.
पण डेव्हिडचा चेहरा आणि फक्त केसच टायगर श्रॉफसारखे नाहीत तर त्यानं आपली बॉडीही टायगरप्रमाणेच मेन्टेन केलीय.
डेव्हिड कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. परंतु, त्याला पुढे शिक्षणात रस नाही. डेव्हिडनं न्यूझीलंडहून स्पोर्ट सायन्सचं शिक्षण घेतलंय... आणि गेल्या दहा वर्षांपासून त्यानं आपल्या बॉडीवर लक्ष केंद्रीत केलंय. अर्थातच, अशी बॉडी बनवण्याचा निर्णय मात्र त्यानं टायगरची प्रेरणा घेऊन घेतलेला नाही.
आसामच्या मंगलदायीमध्ये डेव्हिडचा जन्म झाला. त्याचे वडील एक एअरफोर्सशी निगडीत आहेत तर त्याची आई एक नर्स आहे. परंतु, त्याचं लहानपण मात्र हरियाणात गेलंय. इथंच त्याच्या वडिलांची पोस्टिंग झाली होती.
गेल्या काही महिन्यांपासून टायगर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात काम करतोय... पण, त्याच्या लूकमुळे त्याची जोरदार चर्चा होतेय. त्याचा '4जी - द क्युरिओसिटी' हा आसामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.