अभिनेत्री गायत्री जोशीचा अपघातानंतरचा पहिला फोटो आला समोर; चेंदामेंदा झालेल्या Ferrari च्या शेजारी...

बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात फेरारीमधील जोडप्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळून हे जोडपं ठार झालं.   

शिवराज यादव | Updated: Oct 5, 2023, 01:03 PM IST
अभिनेत्री गायत्री जोशीचा अपघातानंतरचा पहिला फोटो आला समोर; चेंदामेंदा झालेल्या Ferrari च्या शेजारी...

बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. इटलीमध्ये झालेल्या या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अपघात झाला तेव्हा 'स्वदेस' फेम गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय त्यांच्या Lamborghini मध्ये होते. या अपघातात सुदैवाने त्यांना काहाही जखम झाली नाही. पण दुर्दैवाने फेरारीत प्रवास करणं जोडपं ठार झालं आहे. अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळून हे जोडपं ठार झालं. 

Add Zee News as a Preferred Source

रस्त्यावर वेगाने कार पळवत असताना एका ट्रकला धडक दिल्यानंतर ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात तीन गाड्या सहभागी होत्या. ज्यामध्ये गायत्री जोशी आणि तिच्या पतीची Lamborghini, फेरारी आणि कॅम्पर व्हॅन होती. धडक इतकी भीषण होती की, फेरारी कारने पेट घेतला. तसंच लॅम्बोर्गिनी कारचा चेंदामेंदा झाला आणि धडकेमुळे कॅम्पर व्हॅन पलटी झाली. 

63 वर्षीय मेलिसा आणि 67 वर्षीय मार्केस या अपघातात ठार झाले. दरम्यान इतक्या भीषण अपघातानंतरही गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय बचावले. अपघातानंतरचा त्यांचा फोटो समोर आला आहे. या फोटोत दोघेही अपघातग्रस्त गाड्या पाहताना दिसत आहे. यावेळी दोघांनाही प्रचंड धक्का बसल्याचं दिसत आहे. 

गायत्री जोशी रस्त्यावर रडत बसलेली दिसत आहेत. यावेळी रस्त्याशेजारी अपघातग्रस्त गाडी दिसत आहे. 

Sardinia Supercar Tour दरम्यान ही घटना घडली. मागील कारच्या डॅश कॅमेऱ्यात अपघाताचा व्हिडीओ कैद झाला आहे. यामध्ये अनेक स्पोर्ट्स कार एकमेकांच्या मागोमाग धावताना दिसत आहे. निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी ज्यामध्ये विकास आणि गायत्री प्रवास करत होते ती व्हॅनला ओव्हरटेक करण्यासाठी डावीकडे गेली. तसंच मागे असणारी फेरारी ओव्हरेटक करण्यासाठी डाव्या टोकाला जाते , पण नियंत्रण सुटले आणि लॅम्बोर्गिनीला धडकली.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More