मुंबई : सध्या बॉलीवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीचा संगम सिनेसृष्टीत पाहायला मिळत आहे. ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. अलीकडेच आलिया साऊथ चित्रपट आरआरआर आणि संजय दत्त फेम केजीएफमध्ये दिसली होती. आता या अनुषंगाने बॉलीवूड चित्रपटांच्या निर्मात्यांनीही साऊथ स्टार्सशी हातमिळवणी केली असून त्यांना कास्ट करून चित्रपट बनवण्यास सुरुवात केली आहे.
खरंतर बातमी येत आहे की, करण जोहर टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदान्नासोबत त्यांचा आगामी चित्रपट बनवणार आहे. ज्यांचं नाव देखील फायनल झालं आहे. नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, करण जोहरच्या या चित्रपटाचं नाव 'स्क्रू ढीला' असेल. हा एक अॅक्शन चित्रपट असेल. पुढील वर्षाच्या मध्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं नियोजन आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचं शूटिंग या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.
भारताशिवाय या चित्रपटाचं शूटिंग युरोपमध्येही होणार आहे. ज्याचं पहिलं शेड्यूल युरोपमध्ये शूट केलं जाणार आहे. टायगर आणि रश्मिका दोघंही या शेड्यूलचा भाग असतील. टायगर आणि रश्मिकाला स्क्रू ढीलासाठी मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं आहे. तर चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी शोध सुरू आहे. याआधी धर्मा प्रॉडक्शनमध्ये दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांचा मेळ लवकरच 'लाइगर' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.