Good News : कतरिना गरोदर? झूम करुन पाहिले जातायत 'ते' फोटो

अतिशय दिमाखदार सोहळ्यात ही जोडी विवाहबंधनात अडकली आणि पाहता पाहता त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. 

Updated: Apr 12, 2022, 01:10 PM IST
Good News :  कतरिना गरोदर? झूम करुन पाहिले जातायत 'ते' फोटो title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेका विकी कौशल यांचं नातं आणि त्यानंतर त्यांचं लग्न अकनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेलं. सुरुवातीपासूनच या जोडीनं त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवलं. ज्यानंतर एकाएकी त्यांच्या लग्नच्या बातम्या समोर आल्या. (Katrina Kaif vicky kaushal )

अतिशय दिमाखदार सोहळ्यात ही जोडी विवाहबंधनात अडकली आणि पाहता पाहता त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. कतरिनाही फार कमी वेळातच विकीच्या कुटुंबासोबत रुळली. 

विकी आणि कतरिना कधी स्टारकपल म्हणून गणलं जाऊ लागलं याचा अंदाजही चाहत्यांना आला नाही. आता तर म्हणे या जोडीकडे GOOD NEWS आहे. 

भुवया उंचावल्या ना ? सोशल मीडियावर एक व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये कतरिना विमानतळातून बाहेर पडताना दिसत आहे. (Katrina Kaif pregnant)

Katrina Kaif steps out in kurta-palazzo desi look, sparks pregnancy rumours - Pics inside

यावेळी तिनं प्लाझो आणि कुर्ता, ओढणी अशा देसी लूका प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. 

कतरिना अशा रुपात सर्वांसमोर येताच अनेकांनी बऱ्याचदा हा व्हिडीओ थांबवून, झूम करून पाहिला... तिचे काही फोटोसुद्धा झूम करून पाहिले गेले. ही गरोदर आहे... काय सांगता कतरिनाकडे गुडन्यूज अशाच कमेंट या फोटो आणि व्हिडीओवर येऊ लागल्या. 

कतरिनाच्या या नव्या लूकवर येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहता नेमकं  सत्य काय. हाच प्रश्न आता पडू लागला आहे. तुम्हाला काय वाटतं? नेमकं सत्य काय ?