Phullwanti marathi movie Song: अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आगामी चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. लवकरच तिचा 'फुलवंती' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाली नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातील तिचा लूक अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची.... रंभा जणू मी देखणी..असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे
पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. ‘फुलवंती’ चे अस्मानी सौन्दर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला ह्यांचे दर्शन आपल्याला ‘फुलवंती’ ह्या शीर्षकगीतातून होणार आहे.
गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे ह्यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत; आर्या आंबेकर हीने गायले असून गीतकार जोडी अविनाश-विश्वजीत ह्यांनी हे गाणे संगीतबद्ध केलेले आहे; तसेच उमेश जाधव ह्यांचे नृत्य दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी ह्यांची ‘फुलवंती’च्या रूपातील अदाकारी ह्यांनी ह्या शीर्षकगीताला चारचांद लावले आहेत.
‘फुलवंती’ हा संगीतप्रधान ऐतिहासिक चित्रपट असून ह्या चित्रपतील सर्वात महत्वाची भूमिका होती ती म्हणजे संगीत दिग्दर्शकांची आणि म्हणूनच ‘फुलवंती’विषयी अविनाश-विश्वजित म्हणतात की, ‘फुलवंती’ च्या गाण्यांमध्ये असणारी भव्यता, नजाकत, तो काळ आणि सुमधुर संगीत ह्यांचा मेळ साधणं हे एक मोठं आव्हान होतं. आणि त्यासाठी केलेली मेहनत आजपासून प्रेक्षक अनुभवणार आहेत; ह्याची खूप उत्सुकता आहे. तसेच ही पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्की आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे.
11 ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
‘फुलवंती'..शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत... ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
NED
(20 ov) 196/6
|
VS |
USA
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.