पिहू सिनेमाचा ट्रेलर हीट, प्रदर्शनाआधी ट्रेलरमुळे सिनेमा चर्चेत

पिहू सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात २ वर्षाच्या मुलीने पिहूची भूमिका साकारली आहे. 

Updated: Oct 31, 2018, 10:32 PM IST
पिहू सिनेमाचा ट्रेलर हीट, प्रदर्शनाआधी ट्रेलरमुळे सिनेमा चर्चेत title=

मुंबई : पिहू सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात २ वर्षाच्या मुलीने पिहूची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला रिलीज होण्याआधी परदेशातील चित्रपट महोत्सवात नामांकनं आणि पुरस्कार मिळालेले आहेत. पत्रकार विनोद कापरी यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांची पिहूविषयी चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला हा सिनेमा कुणीही करण्यास तयार नव्हतं.

ज्यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे, त्या विनोद कापरी यांनी अनेक लोकांकडे ही पटकथा वाचून दाखवली. पण यावर सिनेमा करण्यास कुणीही तयार नव्हतं.

विशेष म्हणजे २ वर्षाच्या मुलीकडून एवढा वेळ अभिनय, हे फारच कठीण काम असल्याचं अनेक दिग्दर्शकांना वाटत होतं. तेव्हा विनोद कापरी यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.