मुंबई : सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. बुधवारी कोर्टाने सिनेमावर बंदी आणणारी याचिका फेटाळली होती. 'केदारनाथ' हा सिनेमा अगदी सुरूवातीपासूनच वादाचा भोवऱ्यात अडकला आहे.
न्यायालयाने याचिकेला पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगितंल. तसेच 5000 रुपयाचा दंड देखील आकारला आहे. केदारनाथ हा सिनेमा 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं आहे.
PIL filed against the film #Kedarnath for allegedly hurting religious sentiments has been dismissed by Bombay High Court. pic.twitter.com/OM9ELOefH7
— ANI (@ANI) December 6, 2018
ॲड रमेशचंद्र मिश्रा यांनी याचिका दाखल केली होती. केदारनाथ या सिनेमात मंदिरात लव्हस्टोरी दाखवल्याचा याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. केदारनाथ हा सिनेमा सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपुत ही जोडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2013 जूनमध्ये घडलेल्या महाप्रलयावर आधारित हा सिनेमा असून सारा या सिनेमातून डेब्यू करत आहे.