ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पोन्नियिन सेल्वन सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत

साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे.

Updated: Jul 8, 2022, 09:32 PM IST
ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पोन्नियिन सेल्वन सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत title=

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. Ponniyin Selvan 1 च्या या नवीनतम टीझरमध्ये, तुम्हाला दक्षिण अभिनेता विक्रम, कार्ती आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या पात्रांची झलक पाहायला मिळेल.

जबरदस्त आहे पोन्नियिन सेल्वन 1 चा टीझर
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, पोन्नियिन सेल्वन 1 चा हा टीझर अलीकडेच बॉलीवूड चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. पोन्नियिन सेल्वन 1 चा हा टीझर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बाहुबली हा सुपरहिट चित्रपट नक्कीच आठवेल. कारण पोन्नियिन सेल्वनच्या टीझरमध्ये काही सीन्स आहेत जे साऊथचा सुपरस्टार प्रभास बाहुबलीसोबत जुळतात.

मात्र, या चित्रपटाची कथा चोल शासकांभोवती फिरत असल्याचं दिसतं. पण हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नवे विक्रम करेल याचा अंदाज टीझरवरून सहज लावता येतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोन्नियिन सेल्वन 1 चा हा टीझर पाहिल्यानंतर सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पोन्नियिन सेल्वनच्या धमाकेदार टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. मणिरत्नम यांच्या ड्रामा पीरियड चित्रपटात अभिनेते विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम राम आणि त्रिशा कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पोन्नियिन सेल्वनच्या टीझरमध्ये ही सर्व पात्रं भव्य पद्धतीने मांडण्यात आली आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.