मुंबई : 'विरासत' चित्रपटातील अभिनेत्री पूजा बत्रानं 90 च्या दशकात अनेक चित्रपट केले. ती शिल्पा शेट्टीसारखीच असल्याचे म्हटले जात होते. पूजानं 'हसीना मान जायेगी', 'दिल ने फिर याद किया', 'फर्ज' आणि 'कुछ खट्टी कुछ मीठी' यासह अनेक चित्रपट केले. पण 90 च्या दशकानंतर पूजा बत्रा (Pooja Batra ) बॉलिवूडमधून गायब झाली. पूजा आता हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि तिने अनेक अमेरिकन शोजमध्ये काम केले आहे
चित्रपटात येण्यापूर्वी पूजा बत्रानं मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. ही गोष्ट 1993 सालची आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकरही (Namrata Shirodkar) याच ब्यूटी पेजेंटमध्ये सहभागी झाली होती. नम्रता शिरोडकर म्हणजे महेश बाबूची पत्नी. मिस इंडिया स्पर्धेत नम्रता शिरोडकर आणि पूजा बत्रा या दोघीही स्पर्धक होत्या. पूजा बत्राचा आज 27 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने तिच्या ब्यूटी पेजेंटचा मजेदार किस्सा जाणून घेऊया.
मिस इंडिया 1993 च्या ब्यूटी पेजेंटचे सुत्रसंचालन अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांनी केले होते. ब्यूटी पेजेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुली मंचावर उभ्या होत्या. त्यांच्यामध्ये पूजा बत्रा आणि नम्रता शिरोडकरही होत्या. अर्चना पूरण सिंगने त्यांना अंतिम फेरीचा प्रश्न विचारला. या प्रश्नाने 1993 ची मिस इंडिया कोण हे ठरवण्यात येणार होते. 'कोंबडी आधी की अंड?' (Pooja Batra Birthday Actress Competed Against Namrata Shirodkar In Miss India 1993 Pageant This Easy Question Decided Their Fate)
या प्रश्नाला उत्तर देताना नम्रता म्हणाली 'कोंबडी'. पण पूजा बत्रा म्हणाली, 'जोपर्यंत दोन्ही गोष्टी वापरता येतात आणि त्या फायदेशीर असतात, तोपर्यंत कोण आधी येते याला महत्त्व नाही.' या उत्तरानंतर, परिक्षकांनी पूजा बत्राची मिस इंडिया 1993 स्पर्धेत दुसरी उपविजेती म्हणून निवड केली, तर नम्रता शिरोडकर विजेती ठरली. या स्पर्धेत पूजा बत्रा मिस इंडिया इंटरनॅशनल बनली. पूजा बत्राने मार्केटिंगमध्ये एमबीए केले आणि त्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले. येथूनच ब्यूटी पेजेंटमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न तिच्या मनात निर्माण झाले. पूजाने 250 मॉडेलिंग इव्हेंट्स आणि अॅड कॅम्पेन केले. पूजाच्या मॉडेलिंगने तिचे आयुष्य बदलले. ती तिच्या काळातील देशातील टॉप मॉडेल्सपैकी एक होती.
शिकत असताना पूजाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पण शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिनं प्रत्येक चित्रपटाची ऑफर नाकारली. नंतर पूजानं विरासत फिल्म स्टुडिओसोबत करार केला. तब्बू आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'विरासत' या पहिल्या चित्रपटासाठी पूजाला साइन करण्यात आलं होतं. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि पूजा बत्रालाही चांगलीच पसंती मिळाली होती. यानंतर पूजा बत्रा 'भाई' आणि 'हसीना मान जायेगी' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.
पूजा बत्राने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2021 मध्ये पूजा 'स्क्वाड' चित्रपटात दिसली. पूजा आता परदेशी प्रोजेक्ट्समध्ये सक्रिय आहे आणि अनेक अमेरिकन शो करत आहे. तिच्या पर्सनल लाईफमुळेही ती बराच काळ चर्चेत राहिली. तिनं 2002 मध्ये ऑर्थोपेडिक सर्जन सोनू अहलुवालियाशी लग्न केले, परंतु 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. काही काळानंतर पूजा अभिनेता नवाब शाहला डेट करु लागली आणि 4 जुलै 2019 रोजी लग्नबंधनात अडकली.