Pooja Bhatt Birthday Special : रिलेशनशिपमध्ये पूजा भट्टला जबर मारहाण

Pooja Bhatt Birthday Special : पूजा भट्टचा आज 51 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसा निमित्तानं तिच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Updated: Feb 24, 2023, 04:28 PM IST
Pooja Bhatt Birthday Special : रिलेशनशिपमध्ये पूजा भट्टला जबर मारहाण title=

Pooja Bhatt's Birthday Special : बॉलिवूड कलाकार हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. कधी त्यांचं खासगी आयुष्य तर कधी त्यांचे चित्रपट... कधी सेलिब्रिटी असं काही करून जातात की त्यांचं नाव खराब होतं किंवा ते ट्रोलिंगचे शिकार होतात. तर कधी ते असं काही काम करतात की त्यांचं नाव होतं आणि त्यांची स्तुती करण्यात येते. आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ती अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर आलिया भट्टची (Alia Bhatt's Sister) बहीण पूजा भट्ट (Pooja Bhatt) आहे. आज पूजाचा वाढदिवस आहे. पूजा आज तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या विषयी काही गोष्टी जाणून घेऊया. पूजा ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती त्यानंच तिची मारहान केली आणि तिला खूप त्रास दिला. 

पूजानं 'डॅडी' (Daddy) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1989 मध्ये आलेला हा चित्रपट पूजाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी बनवला होता. मात्र, पूजाला खरी लोकप्रियता ही 'ऐ दिल है की मानता नहीं' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळाली होती. पूजानं तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याकाळात पूजा आणि अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) जवळ आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ही जिस्म या चित्रपटादरम्यान झाली होती. दोघेही बराच काळ लिव्ह इनरिलेशनशिपमध्ये देखील होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी....; परश्याच्या वाढदिवसाला रिंकू राजगुरुची Special पोस्ट

मात्र, काही काळानंतर त्या दोघांमध्ये देखील वाद होऊ लागले होते. दोघांमध्ये झालेले वाद इतके वाढले होते की रणवीरवनं पूजा भट्टला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यानं पूजाला इतकी मारहाण केली की तिला रक्तस्त्राव होऊ लागला होता. पूजाला रणवीरच्या काही गोष्टी आवडत नव्हत्या. रणवीर ड्रग्ज घ्यायचा, खूप मद्यपान करायचा. या प्रकरणात दोघांमध्ये अनेकदा वाद होऊ लागले होते. एक दिवस त्यांच्यातला वाद टोकाला गेला आणि रणवीरनं मारहाण केली. ज्या भागाची पूजाची सर्जरी झाली होती त्याजागीच रणवीरनं पूजाला मारल. त्यानंतर पूजानं रणवीरविरोधात पोलिसात तक्राद दाखल केली होती.