तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी....; परश्याच्या वाढदिवसाला रिंकू राजगुरुची Special पोस्ट

Rinku Rajguru ची Akash Thosar साठी खास पोस्ट... रिंकू राजगुरूनं सोशल मीडियावर आकाशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Feb 24, 2023, 01:25 PM IST
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी....; परश्याच्या वाढदिवसाला रिंकू राजगुरुची Special पोस्ट  title=

Akash Thosar Birthday Special : सैराट (Sairat) फेम अभिनेता आकाश ठोसरचा (akash thosar) आज 29 वा वाढदिवस आहे. आकाशला सैराट या चित्रपटातून एकारात्रीत फेम मिळालं होतं. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या चाहत्यांपासून जवळच्या मित्रांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा देत आहेत. आज आकाशसाठी त्याची सैराट या पहिल्या चित्रपटातील सह कलाकार रिंकु राजगुरूनं (rinku rajguru) खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

रिंकूनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी रिंकूनं आकाशसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी पहिल्या फोटोत रिंकुनं पिवळ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे तर आकाशनं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि ऑलिव्ह ग्रीन रंगाची कार्गो पॅन्ट परिधान केली आहे. तर फोटोत रिंकु हसत असून आकाश तिच्याकडे पाहत आहे. हा फोटो शेअर करत रिंकुनं कॅप्शन दिलं आहे की एका पवित्र आत्म्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज- उद्या आणि रोज सगळंकाही Best फक्त तुझ्याचसाठी असो. रिंकु इथेच थांबली नाही तर तिनं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत रिंकूनं तिचा आणि आकाशचा ब्लॅक अँड व्हाईट असा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत रिंकुंनं बॅकग्राऊंडला हॅपी बर्थडे हे गाणं प्ले केलं आहे. 

rinku rajguru shares birthday post for akash thosar went viral

रिंकु आणि आकाश रिलेशनशिपमध्ये? 

दरम्यान, रिंकूनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. ते दोघं जेव्हा पहिल्यांदा सैराटमध्ये दिसले तेव्हाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर अनेकांची इच्छा होती की त्या दोघांनी रिलेशनशिपमध्ये यावे. रिलेशनशिपच्या चर्चांवर त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

हेही वाचा : लेडी सुपरस्टार Nayanthara अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर मोठा खुलासा

rinku rajguru shares birthday post for akash thosar went viral

दरम्यान, सैराट या चित्रपटाच्या सेटवर रिंकू आणि आकाशची भेट झाली होती. आकाशने त्यानंतर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. लवकरच तो 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात स्वतः नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे हे कलाकार दिसणार आहेत.