राज कुंद्राच्या अटकेनंतर पुनम पांडेचा 'तो' किस्सा आला समोर, म्हणाली बाथरुममध्ये जाऊन...

 बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Jul 21, 2021, 09:51 PM IST
राज कुंद्राच्या अटकेनंतर पुनम पांडेचा 'तो' किस्सा आला समोर, म्हणाली बाथरुममध्ये जाऊन...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडेने राज कुंद्रावर फसवणूकीचा आरोप केला होता. ज्यावर तिने याआधी अधिकृत वक्तव्यही केले होतं. पूनम पांडेच्या कारकीर्दीतील पहिल्या फोटोशूटबद्दल आज आम्ही तुम्हाला एक फोटो दाखवणार आहोत. तेव्हापासून पूनम पांडे किती बदलली आहे ते तुम्ही स्वतःच पाहा.

पूनम पांडेने स्वतः तिच्या पहिल्या फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत  तिने निळ्या रंगाच्या शॉर्ट्ससह ऑरेंज रंगाचा बिकिनी टॉप परिधान केलेला दिसत आहे. आता पुन्हा एकदा पूनम पांडेचं पहिलं फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. तिच्या बोल्ड लूकचं चाहते कौतुक करीत आहेत. त्यानंतर पूनम पांडे खूप बदलली आहे आणि तिच्या या परिवर्तनाविषयी चाहते देखील खूप चर्चा करीत आहेत.

पूनम पांडेने तिच्या फोटोशूटचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'माझ्या कारकीर्दीतील पहिलं फोटोशूट, परवीन टालन यांनी हे फोटो क्लिक केले आहेत. तो अनेक प्रतिभावान फोटोग्राफरपैकी एक आहे. मी भाग्यवान होते की, वयाच्या 18व्या वर्षी, मला त्याच्यासोबत फोटोशूट करण्याची संधी मिळाली. मला अजूनही आठवतंय की, मी रीवीलिंग कपडे परिधान केल्यावर बाथरूममध्ये जाऊन रडायचे.

पूनम पांडे तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. पूनम पांडेचे सॅम बॉम्बेशी लग्न झालं आहे. लग्नानंतर पूनम एकाएकी चर्चेत आली. तिच्या नवऱ्याबरोबर हनीमूनवरच वाद झाला होता, जो नंतर तिने सोडवला.

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पूनम पांडेने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने तिचे व्हिडिओ आणि फोटो बेकायदेशीरपणे वापरले आहेत. पूनम म्हणाली की,  पेमेंटच्या अनियमिततेमुळे दोघांमधील करार संपला आहे. तर दुसरीकडे राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाह यांनी हे आरोप जोरदारपणे फेटाळून लावले होते.