Raj Dirty Picture:ठाकरे सरकारच्या 'ऑपरेशन क्लीन' अंतर्गत राज कुंद्रा गजाआड?

यावर्षी राज कुंद्रा फेब्रुवारी महिन्यात त्याने लॉन्च केलेल्या अ‍ॅपमुळे चर्चेत आला होता. मालाड पोलिसांनी छापा टाकल्यानंतरही त्यांने 'बॉलीफेम' हे त्याचं ओटीटी प्लॅटफॉर्म सुरूच ठेवलं होतं.

Updated: Jul 21, 2021, 09:14 PM IST
Raj Dirty Picture:ठाकरे सरकारच्या 'ऑपरेशन क्लीन' अंतर्गत राज कुंद्रा गजाआड?

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राची 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार राज कुंद्राला झालेली अटक ही मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेल्या ऑपरेशन क्लीन या मोहिमेचा एक भाग आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर गोष्टींना लगाम लावण्यासाठी सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील ऑपरेशन क्लीनची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आईपीएस अधिकारी हेमंत नागराले यांच्याकडे दिली आहे. जे सध्या मुंबईचे पोलिस कमिश्नर म्हणून कार्यरत आहेत.

मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेल्या गैरप्रकाराबाबत सतत अपडेट मिळत असतात. अशात आता त्यांनी याबाबत ऑपरेशन क्लीन अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.  मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीत काही संगठीत माफिया आहेत जे इतर कलाकारांना चित्रपट बंद पडण्याच्या धमक्या देत आहेत. सोबतच त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रव्रूत्त करत आहेत. 

राज कुंद्रा अनेकदा आयपीएलवरील सट्टेबाजी आणि इक्बाल मिर्चीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होता. काही अभिनेत्रींनी तर राज कुंद्रा विरोधात अनेकदा तक्रार देखील दाखल केल्याचं ही बोललं जातं आहे. यावर्षी राज कुंद्रा फेब्रुवारी महिन्यात त्याने लॉन्च केलेल्या अ‍ॅपमुळे चर्चेत आला होता. 

मालाड पोलिसांनी छापा टाकल्यानंतरही त्यांने 'बॉलीफेम' हे त्याचं ओटीटी प्लॅटफॉर्म सुरूच ठेवलं होतं. या ओटीटीवर सेक्सुअल थीम्स असणारे फिल्म दाखवण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. 
या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेली एक वेबसिरीज वादात अडकली होती. ज्यात गायिका पलक मुच्छलच्या भावाने म्हणजेच पलाश मुच्छल याने काम केलं होतं. यातील काही आक्षेपार्ह सीन्समुळे राज कुंद्रावर तक्रार दाखल करण्यात आली होती.