लग्नानंतर 12 दिवसांतच मोडला होता पूनम पांडेचा संसार, पतीवर केले होते गंभीर आरोप

Poonam Pandey Marriage: बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाले आहे. पूनम पांडे हिच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 3, 2024, 01:13 PM IST
लग्नानंतर 12 दिवसांतच मोडला होता पूनम पांडेचा संसार, पतीवर केले होते गंभीर आरोप  title=
Poonam Pandey Passed Away KnowActress Love Story Marriage With Sam Bombay

Poonam Pandey Marriage: बॉलिवूड अभिनेत्री पुनम पांडे हिचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. पूनम पांडे हिचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं तिचा मृत्यू झाल्याचा दावा इन्स्टाग्रामवरील पोस्टवरुन करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.   

पूनम पांडे हिने 2013 मध्ये नशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पूनम पांडे हिच्या चित्रपटांपेक्षा इतर वादग्रस्त वक्तव्य व बोल्ड कपड्यांमुळं चर्चेत राहिली होती. पूनम पांडे हिचे खासगी आयुष्याही चर्चेत होते. पूनम पांडे हिचे नाव अनेक जणांसोबत जोडले गेले होते. 

पूनम पांडे आणि वाद हे एक वेगळेच नाते होते. प्रोफेशनल लाइफसोबतच अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. पूनमने 2020 मध्ये तिचा प्रियकर सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. सोशल मीडियावर तिच्या लग्नाबाबत तिने जाहिर केले होते. मात्र, लग्न झाल्यानंतर फक्त 10 दिवसांतच तिचा संसार तुटल्याची माहिती समोर आली होती. तिच्या चाहत्यांसाठीही ही धक्कादाक बाब होती. 

पूनम पांडेचे 12 दिवसांचा संसारातही खूप वाद-विवाद झाले होते. पूनमने तिचा पती सॅम बॉम्बेवर मारहाण केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या वैवाहिक नात्यान कटुता निर्माण झाली होती. त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते. 

सॅम बॉम्बे हा दिग्दर्शक आणि निर्माता होता. दोघांनीही गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर दोघेही हनीमूनसाठी गोव्याला गेले होते. ते फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, लग्नानंतरच तिचे आयुष्य बदलले. काहीच दिवसांत तिचा संसार मोडला. 

पूनमने केलेल्या आरोपांनुसार, सॅम तिला मारहाण करत असायचा. सॅमने तिला अमानुषपणे मारहाण केली त्यामुळं तिच ब्रेन हॅमरेज झालं. तिने मीडियासमोर तिच्या जखमांचे निशाणही दाखवले होते. मारहाणीच्या आरोपांनतर सॅमला अटकदेखील करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली. जेलमधून सुटका झाल्यानंतरही पूनम पांडेसोबत पॅचअप केले होते. मात्र, काही वेळानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाले. 

पूनमने सॅमवर घरगुती हिंसाचारचा आरोप केला होता. त्यानंतर दोघही कायमचे वेगळे झाले. पूनमने यावर प्रतिक्रियादेखील दिली होती. मी माझं लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र सॅमने मला कधीच मानसन्मान दिला नाही. 

पूनमने म्हटलं होतं की, लग्नानंतर सॅममला कुत्र्याप्रमाणे मारहाण करायचा. चार वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये मी सुखाने जगूही शकले नाही. सतत मार खात असायचे. एका क्षणाला असं वाटायचं की यातून लवकर सुटका व्हावी. आत्महत्येचे विचारही मनात डोकवायचे.