मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या 'पुष्पा द राइज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रश्मिकाने अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात काम केलं आहे. ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली आहे. सोमवारी रश्मिका मुंबईत स्पॉट झाली होती. ज्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असं काही घडलं की, लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरुवात केली.
व्हिडिओ पाहून भडकले लोकं
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रश्मिका मंदान्ना एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना काही मुलं तिला घेरतात. ते रश्मिकाकडे पैसे मागतात पण रश्मिका फारसं लक्ष देत नाही. ती तिच्या कारमध्ये बसून पापाराझींसमोर पोज देत आहे. यानंतर एक मुलगी रश्मिकाला बोलते, दीदी तुझा एक सिनेमा आहे ना पुष्पा. तेवढ्यात दुसरी मुलगी येते ती रश्मिकाला सांगते, दीदी पैसे दे, जेवायला हवे आहेत. पण रश्मिका त्यांना पैसे देत नाही आणि तिथून निघून जाते..
रश्मिकाचं वागण पाहून युजर्स संतप्त
काही लोकांना रश्मिकाचं हे वागणं आवडलं नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रश्मिकाने त्या गरीब मुलांना मदत करायला हवी होती. असं काही लोकांचं म्हणणं आहे. तिने काही पैसे दिले असतं. तर तिचं काय झालं असतं का? असं युजर्स तिला सुनावत आहेत.
व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, हे पाहून मूड ऑफ झाला. तर दुसऱ्याने लिहिलं, जर तिने मुलांना काही खायला दिलं असतं तर काय झालं असतं. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिलं, हे लोकं पैशाने श्रीमंत असतात पण मनाने गरीब असतात. तर अजून एका युजर्सने कमेंट करत म्हटलं की, मुलांना खूप वाईट वाटलं. किमान 100 रुपये दिले असते. असे अनेक युजर्स रश्मिकाला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.