Prabhas आणि Kriti च्या चाहत्यांसाठी Good News! लवकरच उरकणार साखरपुडा?

Prabhas नं क्रिती सेननला प्रपोज केलं असून ते लवकरच साखरपुडा करणार आहेत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झाल असून आता ते दोघं कधी या बातमीला दुजोरा देतील याची आतुरता प्रेक्षक करत आहेत.

Updated: Nov 29, 2022, 04:23 PM IST
Prabhas आणि Kriti च्या चाहत्यांसाठी Good News! लवकरच उरकणार साखरपुडा?   title=

Prabhas and Kriti Sanon Engagement : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि प्रभास (Prabhas) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. वरुण धवननं केलेल्या एका वक्तव्यामुळे ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. वरुण आणि क्रिती एका शोमध्ये त्यांचा चित्रपट भेडीयाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. त्यावेळी वरुण म्हणतो, एक माणूस आहे ज्याच्या हृदयात क्रिती आहे, जो मुंबईत नाही, तो सध्या दीपिकासोबत शूटिंग करत आहे. हे ऐकल्यानंतर अंदाज कोणीही अंदाज लावेल की वरुण कोणा विषयी बोलतोय. प्रभास आणि दीपिका हे सध्या ‘प्रोजेक्ट के‘ साठी एकत्र काम करत आहेत. त्यासगळ्यात आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये प्रभास आणि क्रिती हे दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याचे म्हटले आहे. 

रिपोर्ट्सनुसार, प्रभासनं 'आदिपुरुष'च्या सेटवर क्रिती सेनॉनला प्रपोज केलं आणि तिने त्याला होकार दिल्याचे म्हटले आहे. त्या दोघांच्या कुटुंबाला त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आनंद आहे. प्रभास आणि क्रिती यांना त्यांच्या रिलेशनशिपला पुढेच्या टप्यावर घेऊन जायचं आहे. आदिपुरुषच्या प्रदर्शनानंतर ते दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याचे म्हटले आहे. 

पाहा ट्वीट

prabhas proposed to kriti sanon planning to get engaged soon as per report

जेव्हा क्रिती 'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan) या शोमध्ये दिसली तेव्हा गेमच्या वेळी क्रितीनं सगळ्यात आधी प्रभासला कॉल केला आणि त्याला 'हे करण इट्स मी' म्हणाला. याशिवाय क्रिती एका मुलाखतीत म्हणाली की, तिला प्रभाससोबत लग्न करायला आवडेल. (Karan Johar) आतापर्यंत प्रभास आणि क्रितीनं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. चाहते त्याची आतुरतेने प्रतिक्षा करत पाहत आहेत. (prabhas proposed to kriti sanon planning to get engaged soon as per report) 

हेही वाचा : भर कार्यक्रमात Varun Dhawan ने केली पोलखोल; नाव घेताच Kriti Sanon लाजली; पाहा Video

प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच (Adipurush) 'आदिपुरुष'मध्ये एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत. 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर टीझर विरोधात जोरदार  टीका झाली आहे. व्हीएफएक्सपासून ते कलाकारांच्या लूकपर्यंत सगळ्याच गोष्टीवर त्यांना ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, जे चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. त्यांना अजून थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. कारण सर्वात आधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता त्याच्या प्रदर्शनाची तारिख ही बदलून 2023 मध्ये येणार आहे.