भर कार्यक्रमात Varun Dhawan ने केली पोलखोल; नाव घेताच Kriti Sanon लाजली; पाहा Video

jhalak dikhhla jaa 10 grand finale: वरूणने क्रितीची (Varun Dhawan) पोलखोल केल्याचं दिसून आलं. त्यावेळी नाव ऐकताच क्रिती सेनॉन (Kriti Sanon) लाजल्याचं देखील पहायला मिळालं.

Updated: Nov 27, 2022, 11:07 PM IST
भर कार्यक्रमात Varun Dhawan ने केली पोलखोल; नाव घेताच Kriti Sanon लाजली; पाहा Video  title=
Varun Dhawan,Kriti Sanon,jhalak dikhhla jaa 10

Varun Dhawan: अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. अत्यंत कमी वेळेमध्ये क्रितीने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अशातच क्रिती सनॉन आणि वरूण धवनचा (Varun Dhawan) नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भेडिया' चित्रपटाला (Bhediya) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने लोकांना थिएटरमध्ये खेचण्यात यश मिळवलंय. (kriti sanon is dating prabhas bhediya actor varun dhawan reveals in jhalak dikhhla jaa 10 grand finale)

सिनेमाच्या प्रमोशनसाठी क्रिती आणि वरूण धवन फिरताना दिसत आहेत. अशातच 'झलक दिखला जा 10' हा शोमध्ये (Jhalak Dikhhla Jaa 10) वरूण आणि क्रितीने हजेरी लावली होती. त्यावेळी वरूणने क्रितीची (Varun Dhawan) पोलखोल केल्याचं दिसून आलं. त्यावेळी नाव ऐकताच क्रिती सेनॉन (Kriti Sanon) लाजल्याचं देखील पहायला मिळालं.

वरण धवन करण जोहरला (Karan johar) विचारतो... माधुरी मॅम शिवाय एवढ्या सुंदर दिसण्याचा अधिकार कोणाला नाही? काजोल, राणी, करीना, आलिया की दीपिका? यानंतर करणने वरूणला विचारलं की तुला काय वाटतं? यावर वरुणने त्याला जाब विचारला. यासोबतच 'कॉफी विथ करण'मध्ये तो आलियाच्या (Aalia Bhatt) नावाची पुन्हा पुन्हा खिल्ली उडवतो. 

अखेर वरूण धवनने आपला प्रश्न लावून धरल्यावर बरंच काही सांगून झाल्यावर करणने त्याच्या उत्तरात दीपिकाचं (Deepika Padukone) नाव घेतलं. जजच्या खुर्चीवर बसून क्रिती पाहत राहते. त्यावरून करणने गुगली टाकली. यावेळी करण जोहर वरुणला विचारतो की, त्यात क्रितीचं नाव का घेतलं नाही?

आणखी वाचा - Bella Hadid ने Urfi Javed ला केलं कॉपी? Topless होत फोटोशूट

त्यावर लगेच क्रिती म्हणते, माझं नाव का नाही?, हाच प्रश्न मीही विचारणार होते, तेव्हा वरुण म्हणतो की क्रितीचं नाव त्यात नाही कारण तिचं नाव कोणाच्या तरी हृदयात आहे. मग करण विचारतो कोणाच्या मनात आहे? वरुण म्हणतो, एक माणूस आहे जो मुंबईत नाही, तो सध्या दीपिकासोबत शूटिंग करत आहे. हे ऐकून करणला धक्काच बसला.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साउथ एक्टर प्रभास (kriti sanon is dating prabhas) आणि क्रिती यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांमध्ये नक्की काय शिजतंय?, असा प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जातोय. अशातच वरूणच्या टोमण्यावरून आता अनेकांचा विश्वास पक्का झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता येत्या काही दिवसात या जोडीची चर्चा होणार असल्याचं दिसतंय.