'घरंच लग्न...', Prajakta Mali च्या घरात वाजले सनई-चौघडे

प्राजक्ता माळीच्या घरी लगीन घाई... लग्नाचे फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...   

Updated: Nov 22, 2022, 11:47 AM IST
'घरंच लग्न...', Prajakta Mali च्या घरात वाजले सनई-चौघडे title=

Prajakta Mali : सध्या झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकत आहेत. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींच्या घरी देखील लग्नाचं वातावरण आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (prajakta mali) घरी देखील लगीन घाई दिसून आली. खुद्द अभिनेत्रीने लग्नाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्राजक्ताची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे प्राजक्तला कुटुंबासोबत पाहून चाहते देखील आनंदी झाले आहे. (prajakta mali family)

प्राजक्ता माळीच्या 'घरंच लग्न'

प्राजक्ता माळीच्या भावाचं लग्न नुकताच मोठ्या थाटात पार पडलं. लग्न सोहळ्यातील फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शन देखील फार छान दिलं आहे. सध्या सर्वत्र प्राजक्ताच्या फोटो आणि कॅप्शनचीच चर्चा आहे. (prajakta mali lifestyle)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्त माळीची सोशल मीडिया पोस्ट
भावाच्या लग्नातील फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, 'भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी... तेव्हा कुठे जाऊन look साधला गेला आणि आत्मा सुखावलां.' महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री नऊवार साडी शिवलेली नसून, नेसलेली असल्याचं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. शिवाय अभिनेत्रीने दागिने थेट कोल्हापूरातून आणले आहेत. (prajakta mali contact number)

प्राजक्ताने शेवटी असतलेल्या फोटोचं देखील खास महत्त्वा सांगितलं आहे. 'शेवटचा फोटो- ४ पिढ्या एकत्र लग्नाचा आनंद लूटत होती.' आजच्या धकाधकीच्या जीवनात एकत्र कुटुंबाचा आनंद फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. (prajakta mali husband name)

प्राजक्ताच्या फोटोंवर अनेकांच्या (prajakta mali instagram) कमेंट आणि लाईक्स येत आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, 'तू किती छान आहे प्राजु सगळी नाते गोती एकदम जपून सगळ्या गोष्टीचा समतोल राखून करते अगणित प्रेम तुला...' सध्या प्राजक्ताच्या 'घरंच लग्न' सोशल मीडियावर चर्चेत आहे.