पहिली पत्नी घराबाहेर जाताच अरमान मलिक का म्हणाला? 'आयुष्य संपवून...'

Armaan malik Say Faansi Laga Lunga :  अरमान मलिकनं पहिली पत्नी पायलच्या 'बिग बॉस OTT' च्या घरातून बाहेर आल्यानंतर का केलं असं वक्तव्य...

दिक्षा पाटील | Updated: Jul 5, 2024, 11:09 AM IST
पहिली पत्नी घराबाहेर जाताच अरमान मलिक का म्हणाला? 'आयुष्य संपवून...' title=
(Photo Credit : Social Media)

Armaan malik Say Faansi Laga Lunga : 'बिग बॉस ओटीटी 3' या शोच्या सुरुवातीपासून मुनीषा ही दुसऱ्या स्पर्धकांचे कार्ड्स म्हणजेच भविष्य वाचताना दिसते. तिला दुसऱ्यांचे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याविषयी सांगताना दिसते. आता लेटेस्ट एपिसोडमध्ये मुनीषा ही लवकेश कटारियासोबत बोलत होती. दोघंही बिग बॉसच्या घराच्या बाहेर असलेल्या लॉनमध्ये बसून बोलत होते. तर दुसरीकडे अरमान मलिक जो रणवीर शौरी आणि दीपक चौरसियासोबत बसलेला असतो. तो मुनीषा असं काही बोलतो की सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे. 

कोणाला गळफास देण्याविषयी बोलला अरमान मलिक...

अरमान मलिक हा रणवीर शौरी आणि दीपक चौरसियासोबत बसलेला असतो तेव्हा दीपक बोलतो की मुनीषाला वाटतं की ती शोची विजेती आहे. रणवीर हसताना बोलतो की अच्छा तिला पण वाटतं का. त्यानंतर अरमान परत मस्तीमध्ये बोलतो की 'दोर घेऊन या यार, मी गळफास लावून देईन.' त्यानंतर जेव्हा नॉमिनेशन टास्क होता तेव्हा अरमान, मुनीषाचं नाव घेतो आणि बोलतो की ती फक्त दुसऱ्यांच्या भांडणात इकडच्या गोष्टी तिथे सांगते. तर मुनीषा व्यतिरिक्त अरमान हा सना मकबूल आणि विशालचं नाव घेतो. 

अरमान आणि विशाचं शोच्या सुरुवातीपासून पटत नाही. दोघांचं अनेकदा भांडण झालं आहे. अरमान त्याला मच्छर बोलला होता. 

अरमान शोमध्ये त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि क्रितिका मलिकसोबत गेला होता. तर पायल या शोमधून पहिल्याच आठवड्यात बाहेर पडली. पण बाहेर राहून ती शो रोज पाहते आणि त्यावर रिअॅक्शन देखील देते. त्याशिवाय अरमान आणि क्रितीकासाठी सोशल मीडियावर वोट्सची अपील केली. पायलची इच्छा आहे की ते दोघं फिनाले पर्यंत जावे आणि एकानं तरी ट्रॉफी घर घेऊन यावी. 

हेही वाचा : अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा'साठी गाणं गाणाऱ्या 'या' लोकप्रिय गायकानं गुरुसाठी बदललं आडनाव

दरम्यान, अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि क्रितीका या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र, त्यांची खरी ओळख ही युट्यूबर म्हणून आहे. त्यांनी युट्यूबर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यांचे व्लॉग्स आजही प्रेक्षक पाहताना दिसतात.