अभिनेता प्रतिक बब्बर ‘या’ मुलीशी करणार लवकरच लग्न

'जाने तू या जाने ना', 'एक दीवाना था' आणि 'धोबी घाट' सारख्या वेगळ्या पठडीतील सिनेमा करणारा अभिनेता प्रतिक बब्बर लवकरच एन्गेज होणार आहे. सिनेमात फारसा यशस्वी ठरलेला प्रतिक आता लग्न बेडीत अडणार आहे. 

Updated: Jan 5, 2018, 08:54 AM IST
अभिनेता प्रतिक बब्बर ‘या’ मुलीशी करणार लवकरच लग्न title=

मुंबई : 'जाने तू या जाने ना', 'एक दीवाना था' आणि 'धोबी घाट' सारख्या वेगळ्या पठडीतील सिनेमा करणारा अभिनेता प्रतिक बब्बर लवकरच एन्गेज होणार आहे. सिनेमात फारसा यशस्वी ठरलेला प्रतिक आता लग्न बेडीत अडणार आहे. 

कुठे होणार साखरपुडा?

मीडिया रिपोर्टनुसार, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर गरफ्रेन्ड सान्या सागरसोबत साखरपुडा करणार आहे.  येत्या २२ तारखेला प्रतिक लखनऊमध्ये सान्यासोबत साखरपुडा करणार आहे. प्रतिक तीन वर्षांनी ‘बागी २’ मधून मोठ्या पडद्यावर परत येतोय. अहमद खानच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात तो व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. 

कोण आहे सान्या?

साखरपुड्याबाबत एका सूत्राने सांगितले की, ‘साखरपुड्यात काही मोजक्याच नातेवाईकांना बोलवण्यात आलं आहे. त्याचा साखरपुडा लखनऊमध्ये होणार असला तरी सगळं अजून फायनल झालेलं नाहीये. तारखेत बदल होऊ शकतो. प्रतिक आणि सान्या गेल्या ८ वर्षांपासून ऎकमेकांना ओळखतात. पण त्यांच्यातील रिलेशनशीपची सुरूवात २०१७ मध्ये सान्या लंडनहून परत आल्यावर झाली.