26 जानेवारीला रिलीज होणार Bigg Boss च्या या एक्स कंटेस्टंटचा सिनेमा

बिग बॉस फेम मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत यांचा आगामी सिनेमा लवकरच भेटीला येत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 4, 2018, 08:35 PM IST
26 जानेवारीला रिलीज होणार Bigg Boss च्या या एक्स कंटेस्टंटचा सिनेमा  title=

मुंबई : बिग बॉस फेम मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत यांचा आगामी सिनेमा लवकरच भेटीला येत आहे. 

या जोडीचा भोजपुरी सिनेमा 'पाकिस्तान में जय श्रीराम' हा सिनेमा मुंबई आणि गुजरातनंतर आता बिहारमध्ये 26 जानेवारी रोजी रिलिज होणार आहे. 

Monalisa

सिनेमाचे निर्माता भूपेंद्र विजय सिंह यांनी बुधवारी सांगितले की, पाकिस्तान में जय श्रीराम या सिनेमाच्या माध्यमातून देशभक्तीची भावना भोजपुरी पडद्यावर दाखवण्याचा खास प्रयत्न आहे. सिनेमांत गरजेनुसार देश, राष्ट्रध्वज, भारत सरकारचा उल्लेख केला आहे. 

Monalisa

त्यांनी सांगितले की, एका खास दृष्यात पाकिस्तानमध्ये आपल्या भारताचा झेंडा बघताना अभिमान वाटतो. खासकरून भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये सिनेमे फँटसीच्या आधारावर तयार केले जातात. मात्र या सिनेमांत समाज आणि देशावर अत्याचार, अन्याय यावर आधारित वेगवेगळ्या घटना दाखवल्या आहेत. 

Monalisa

या सिनेमाला मुंबई आणि गुजरातच्या प्रेक्षकांना भरपूर पसंत केलं. आता हा सिनेमा 26 जानेवारी रोजी बिहार आणि झारखंडमध्ये प्रदर्शित होत आहे. 

Monalisa

राजपूत फिल्म्स फॅक्ट्रीच्या बॅनरखाली तयार झालेला हा सिनेमा भोजपुरी इंडस्ट्रीतील फिटनेस ऑयकॉन विक्रांत सिंह राजपूत आणि बिग बॉस फेम मोनालिसा या जोडीसोबत आहे. 

Monalisa

सिनेमाचे दिग्दर्शक रामाकांत प्रसाद असून या सिनेमांत खलनायक म्हणून अवधेश मिश्रा, नेहा सिंह, हिरा यादव, धामा वर्मा, बालगोविंद बंजारा, प्रेम प्रधान, उल्हास कुडवे आणि सोनिया मिश्रा हे प्रमुख भूमिकेत आहेत.