मुंबई : 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा' , 'फुगे'.. अशा चित्रपटांमधून रसिकांच्या भेटीला आलेली प्रार्थना बेहरे आज लग्नबंधनामध्ये अडकणार आहे.
अरेन्ज मॅरेज पद्धतीने प्रार्थना आज अभिषेक जावकरसोबत लग्न करणार आहे. हे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असावं अशी त्यांची इच्छा असल्याने आज गोव्यामध्ये हे लग्न पार पडणार आहे.
प्रार्थना ही मूळची बडोद्याची आहे. तिच्या राहत्या घरी काही विधी पार पाडल्यानंतर आता १२,१३ आणि १४ नोव्हेंबरला उर्वरित लग्न विधी पार पडणार आहेत.
काही दिवसांपूर्वीपासून प्रार्थना बेहरे तिच्या लग्न विधीचे काही फोटो सोशल मीडीयावर शेअर करत होती. आता तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली आहे.
वैभव तत्त्ववादी, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थनाच्या हळदीचे आणि मेहंदीचे काही फोटो शेअर केले होते. काल प्रार्थनाच्या लग्नातील संगीत सोहळ्याची धमालदेखील सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आणली आहे.