करारी नजर अन् फायटिंग सीन...; प्रेग्नंट दीपिकाचा 'सिंघम अगेन'मधील रावडी लूक पाहिलात का?

 बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. तिचे या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहेत.

Updated: Apr 17, 2024, 06:27 PM IST
करारी नजर अन् फायटिंग सीन...; प्रेग्नंट दीपिकाचा 'सिंघम अगेन'मधील रावडी लूक पाहिलात का? title=

Deepika Padukone Singham Again Shooting : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे बोललं जात आहे. सिंघम अगेन या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. तिचे या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहेत. 

दीपिका पदुकोणने काही दिवसांपूर्वीच ती आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटाचे शूटींग किंवा प्रमोशन करताना झळकली नव्हती. त्यानंतर आता पहिल्यांदाच दीपिका ही सिंघम अगेनच्या सेटवर झळकली आहे. दीपिकाने सिंघम अगेन या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. सध्या दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दीपिका ही पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. त्यासोबतच यात ती केसांचा बन, डोळ्यावर सनग्लासेस अशा लूकमध्ये दिसत आहे. 

दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या फोटोत दीपिका एका सीनचे शूटींग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात तिच्या आजूबाजूला गुंडांच्या भूमिकेतील काही कलाकार पाहायला मिळत आहेत. यात दीपिका ही फाईट सीन्सचे दृश्य शूट करत असल्याचे बोललं जात आहे. यात रोहित शेट्टी आणि स्टंट करणारे काही सदस्य तिला सूचना देत असल्याचे दिसत आहेत. सध्या दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दीपिकाचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडला आहे. सिंघम अगेन या चित्रपटाद्वारे दीपिका ही रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये पदार्पण करत आहे. सिंघम अगेन या चित्रपटात दीपिका पदुकोण खास कॅमिओ करणार आहे. यात दीपिकाच्या पात्राचे नाव शक्ती शेट्टी असे असणार आहे. 

प्रदर्शनाच्या तारखेत बदल

दरम्यान ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे शूटींग गेल्यावर्षी हैदराबादमध्ये सुरु झालं. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दीपिका पदुकोण, अजय देवगण, रणवीर सिंग, करीना कपूर-खान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिंघम अगेन हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या शूटींगला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सिंघम अगेन या चित्रपटाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगितले जात आहे.