Did Youtuber Armaan Malik converted to Islam : लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अरमान मलिक हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. त्यानं दोन वेळी लग्न केलं म्हणून त्याला अनेकांनी ट्रोल केलं. मात्र, आजही त्याचे व्लॉग्स हे चांगलेच व्हायरल होतात. इतकंच नाही तर चर्चेत राहतात. या सगळ्यात चर्चा एका वेगळ्याच गोष्टीची रंगली आहे आणि ती म्हणजे अरमानच्या खऱ्या नावाची. अरमानचं खरं संदीप आहे. असं म्हटलं जातं की लोकप्रियता मिळवण्यासाठी दोन करण्याचं नाटक अरमान मलिकनं केलं. अनेकांनी हे देखील सांगितलं की संदीपनं दोन लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन केलं आणि हिंदूमधून मुस्लिम धर्म स्विकारला.
आता स्वत: युट्यूबर अरमान मलिकनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. अरमाननं न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. 13 वर्षां पूर्वी दिल्लीत आलो होते. दिल्लीमध्ये असलेल्या झगमगमध्ये मला वाटलं की संदीप या नावात इतका जोर नाही. जेव्हा मित्रांसोबत उभा रहायचो, तर कोणाचं नाव राहुल होतं, कोणाचं प्रिंस. या सगळ्यात माझ्या नावात जोर नव्हता, तर मी अरमान मलिक ठेवलं. मी विचार केला की हे नाव बोलताना मज्जा येईल आणि ऐकायला सुद्धा. काही लोक जे हे हिंदू आणि मुस्लिमच्या गोष्टी करतात. हे सगळं चुकीचं आहे. मी हिंदू आहे आणि आयुष्यभर हिंदू राहिन.
पुढे अरमाननं लग्नासाठी धर्म बदलण्यावर वक्तव्य केलं आहे. अरमान म्हणाला, मी लग्नासाठी कोणताही धर्म बदलला नाही आणि या लोकांची विचारसरणी ही खूप छोटी आहे. पुढे अरमान म्हणाला की जे लोक त्याच्या दोन लग्नांना खोटं असल्याचं बोलतात किंव धर्म बदलण्यावर बोलतात, ते स्वत: त्यांच्या आयुष्यात दु:खी आहेत.
हेही वाचा : 46 व्या वर्षी काजोलच्या बहिणीनं व्यक्त केली लग्न आणि आई होण्याची इच्छा, का आतापर्यंत राहिली अविवाहीत?
अरमान मलिकचं पहिलं लग्न पायल मलिकशी झालं. त्यानंतर त्यानं क्रितीका मलिकशी दुसरं लग्न केलं. पायलला तीन मुलं आहेत, तर क्रितीकाला एक मुलगा आहे. अरमान हा दोन पत्नी आणि चार मुलांसोबत सुखी आयुष्याचा आनंद घेत आहे.