चक्क चाहा-कॉफीमुळे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच ब्रेकअप!

या जगात प्रत्येक गोष्टीला न्याय मिळाला आहे. मग चहा-कॉफीलाच का नाही.

Updated: Apr 22, 2022, 09:12 PM IST
चक्क चाहा-कॉफीमुळे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच ब्रेकअप! title=

मुंबई : या जगात प्रत्येक गोष्टीला न्याय मिळाला आहे. मग चहा-कॉफीलाच का नाही. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यात आता चहा कि कॉफी सगळ्यात जास्त विश्रांती कशामुळे मिळते यावरून भांडण झालं आहे. आणि त्यांनी या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

खरं तर, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची पहिली कायदेशीर ड्रामेटीक वेब सीरिज 'गिल्टी माइंड्स'ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यासोबतच या सिरिजची स्टारकास्ट जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक दिसत आहे. मात्र, रिलीज होण्यापूर्वी, नागिन फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी त्यांच्या वकिलांसोबत चहा आणि कॉफीसाठी न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.

अॅमेझॉन प्राइमने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तेजस्वीचे वकील करणला कॉफी वाईट असल्याचं सांगून ब्रेकअप करण्याचा सल्ला कसा देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Amazon Prime Video ची पहिली , कायदेशीर वेब सिरीज  शेफाली भूषण दिग्दर्शित Guilty Minds चा आजपासून प्रीमियर सुरु होत आहे. या सिरीजमधील सीनबद्दल बोलताना, दिग्दर्शक शेफाली भूषण म्हणाली, ''ही सिरीज बनवण्यासाठी खूप संशोधन केलं गेलं कारण आम्हाला आईपीसीच्या विभागांसाठी अतिशय अचूक तर्क आणि संदर्भ हवे होते.