Priyadarshani Indalkar : सोशल मीडियानं आपल्या आयुष्यात एक नव संजीवनी आणली यात काहीच दुमत नाही परंतु याचा गैरवापरही अनेक जणं करताना दिसतात. त्यातून मुलींच्या, महिलांच्या फोटोंवरती आक्षेपार्ह कमेंट्स, अश्लील कमेंट्सही अनेकांकडून केले जातात. सायबर गुन्ह्यांच्याही अनेक महिला, पुरूष शिकार होतात. सोबत हॅकिंगचेही अनेक प्रकार हे वाढू लागले आहेत. त्यामुळे अशावेळी सर्वांसाठी सायबर सुरक्षितता ही फारच महत्त्वाची असते. एकूणच सोशल मीडियावरही गैरप्रकार हे घडताना दिसत आहेत. नुकत्याच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं याविषयी आवाज उठवला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर हिला सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह मेसेज आले आहेत. ज्याचा स्क्रीनशॉर्ट तिनं आपल्या सोशल मीडियावरील अकांऊटवरून शेअर करत याविरूद्ध आवाज उठवला आहे.
अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल करणे, त्यातून त्यांच्या फोटोंखाली अश्लील किंवा आक्षेपार्ह कमेंट्स करणे यामुळे अशावेळी अशा घडल्या प्रकारांची बरीच चर्चा असते. यावेळी प्रियदर्शनी इंदलकरनं शेअर केलेल्या या स्क्रीनशॉर्ट्सवरून समजते की या विषयाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. नक्की हा प्रकार काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. प्रियदर्शनी इंदलकर ही मराठीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतून तिला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. सध्या ही मालिका मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून ही मालिका जोरात सुरू आहे. प्रियदर्शनीचा यावर्षी सुबोध भावेसोबतचा 'ती फुलराणी' या चित्रपटातून समोर आली होती.
हेही वाचा : रणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?
सोशल मीडियावर अभिनेत्रींना ट्रोलही केले जाते. त्यातून अनेकदा त्यांच्या फोटोंवरती आक्षेपार्ह कमेंट्सही येताना दिसतात. नुकताच रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडीओ हा व्हायरल झाला होता. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुरू असलेले गंभीर प्रकार वेळीच आवरणे गरजेचे झाले आहे. परंतु महिलांना यावेळी टार्गेट केले जाते.
प्रियदर्शनी इंदलकर हिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून तिला एका पुरूषाकडून सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्सचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे आणि घडल्या प्रकाराबद्दलही तिनं माहिती दिली आहे. तिनं शेअर केलेल्या स्क्रीनशॉर्टवरून समजून येते की यातून तिला अत्यंत चुकीचे मेसेज करण्यात आले आहेत.
स्टोरी शेअर करत ती म्हणाली, ''अर्थात अशा कमेंट्स, मेसेज येणार!फोटो टाकतानाच कळायला पाहिजे. अनेक पुरुष अशा फोटोजवर खूप gracefully comment करतात. एखादा फोटो hot वाटणं आणि ते व्यक्त करणं ही गोष्ट offensive नाही. पण, अशा पद्धतीचे मेसेज नक्कीच offensive आहेत आणि ते ignore करत राहिलो तर हे normalise होईल. म्हणून हे सगळं लिहितेय.
आणि या उपर फोटोचा काही संबंध नसतानाही असे अनेक मेसेज अनेक मुलींना येत असतात. काही प्रमाणात मुलांनाही येत असतात. तर या सोशल मीडियाच्या निनावी जनतेला तसं तर आपण काही करू शकत नाही. फक्त आपल्या बाबतीत ‘रिपोर्ट’ करु शकतो आणि मी याबद्दल स्वत:ला खरोखर भाग्यवान समजते कारण मला (तुलनेने) इन्स्टाग्राम परिवाराकडून खूप सकारात्मक प्रेम मिळालं आहे!'', असं तिनं लिहिलं आहे.