Ranveer Singh: कुणी सेलिब्रेटी हे कधी घराची खरेदी करतात तर कधी घर विकून टाकतात. सध्या अभिनेता रणवीर सिंगची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं आपले गोरेगाव येथील दोन फ्लॅट विकले असल्याचे वृत्त समोर येते आहे. सेलिब्रेटींच्या संपत्तीची अनेकदा चर्चा होताना दिसते. सोबतच टॅक्स वाचवण्यासाठी आपली संपत्ती विकतात किंवा कुणाला तरी भेटवस्तू म्हणून मोठी प्रोपर्टीही देतात अशा वेळी त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते.
मनी कंट्रोलनं दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यानं हे फ्लॅट्स 2014 मध्ये विकत घेतले होते. ज्यांची तेव्हा किंमत ही 4.64 कोटी होती. ऑनलाईन प्रोपर्टी कन्सलटंन्सी इंडेक्स टॅप डॉट कॉमच्या कागदपत्रांनूसार ही माहिती कळते आहे. हे दोन्ही फ्लॅट्स ऑबेरॉय रियल्टीमध्ये आहेत.
गोरेगाव ईस्टला हा प्रोजेक्ट आहे. ऑबेरॉय मॉलच्या जवळच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नजीक हे फ्लॅट्स आहेत. कागदपत्रांनुसार, हे दोन्ही फ्लॅट्स 1324 स्केअर फूट आहेत. येथे सहा पार्किंग स्पॉट्स आहेत. या प्रत्येका फ्लॅटची स्टॅम्प ड्यूटी 45.75 लाख इतकी आहे. 6 नोव्हेंबर नोंदणी झाल्याचे समजते आहे. रणवीर सिंगकडे याहून अनेक फ्लॅट्स आहेत. 2022 साली त्यानं बांद्रा येथे 119 कोटी रूपयांचा फ्लॅट विकत घेतला होता.
रणवीर सिंगचे अनेक चित्रपट गाजले आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण यांनी 'कॉफी विथ करण' च्या पहिल्या भागात हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. सोबत रणवीर सिंगचा आता सिंघम अगेन हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यात प्रेक्षकांना दीपिका पादूकोणही पाहायला मिळणार आहे.