शरीरावर शस्त्राचे वार; अभिनेत्याच्या मृत्यूनं खळबळ

घरातच आढळला मृतदेह... 

Updated: Oct 22, 2020, 02:21 PM IST
शरीरावर शस्त्राचे वार; अभिनेत्याच्या मृत्यूनं खळबळ
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कला विश्वाला आणखी एक हादरा देणारी बातमी समोर आल्यामुळं एकच खळबळ पाहायला मिळत आहे. आत्महत्या, धमकी आणि अचानकच काही कलाकारांच्या निधनातून हे कलाविश्व सावरत नाही तोच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. 

तुळू चित्रपट अभिनेता आणि बऱ्याच कारणांनी चर्चेत असणाऱ्या अभिनेता सुरेंद्र बंतवाल याचा मृतदेह त्याच्याच बंतवाल या शहरातील घरी सापडला. बुधवारी ही माहिती समोर आल्यानंतर बऱ्याच चर्चांनी जोर धरला. बंतवाल पोलिसांच्या माहितीनुसार त्याचा मृतदेह घरातील सोफ्यावर आढळला. त्याच्या मृत शरीरावर चाकूचे वारही आढळले. 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शक्य त्या सर्व दृष्टीकोनातून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार प्राणघातक शस्त्रानं हल्ला करत त्याची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास सुरेंद्र फोनचं उत्तर देत नसल्यामुळं घरी गेले असता त्याच्या मित्रांना या घटनेची प्रथम माहिती मिळाल्याचं म्हटलं जात आहे. सदर घटनेबाबत कळताच पोलीस आणि श्वानपथकानं तातडीनं या ठिकाणी धाव घेत तपास प्रक्रिया सुरु केली.