मुंबई : 1 आणि 2 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकलेले प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे लवकरच 2 रिसेप्शन देण्याची माहिती समोर आली आहे. ईशा अंबानीचं प्री वेडिंग झाल्यानंतर प्रियंका - निक लगेचच ओमानला हनीमूनसाठी गेले. त्यानंतर ते दोघं पुन्हा एकदा ईशा अंबानीच्या लग्नाला देखील दिसले.
या सगळ्या धावपळीत सध्या प्रियंका - निक खूप बिझी आहेत. 1 आणि 2 डिसेंबर रोजी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने जोधपुरमध्ये हा सोहळा संपन्न झाला. यानंतर 4 डिसेंबर रोजी दिल्लीत रिसेप्शन पार पडलं.
तसेच आता 19 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी लग्नाचे 2 रिसेप्शन असणार आहेत. आता 2 रिसेप्शनचा ट्रेंड दिसत आहे. दीपवीरने देखील त्यांच्या लग्नानंतर असेच 2 रिसेप्शन ठेवले होते.
19 डिसेंबरच्या रिसेप्शनला नॉन फिल्मी लोकांना आमंत्रण दिलं आहे. यामुळे बिझनेसशी संबंधीत आणि इतर मंडळी असतील. तर 20 डिसेंबर रोजी फिल्म स्टार्स आणि या इंडस्ट्रीशी संबधित असलेले मान्यवर असणार आहेत.
अशी माहिती मिळतेय की, या दोन्ही रिसेप्शनचे वेन्यू वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे दोन्ही रिसेप्शनला प्रियंका - निकचा वेगवेगळा लूक पाहायला मिळणार आहे.
प्रियंका चोप्राने इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोन फोटो आहेत एकात निक आणि प्रियंका आपले खास क्षण एकमेकांसोबत घालवत आहेत. प्रियंकाच्या हातावरील मेहंदी ही अगदी तिच्या नववधुची साक्ष देत आहे.
तर दुसऱ्या फोटोत प्रियंकाने बीचच्या किनाऱ्यावर वाळूत बदामाच चित्र काढून त्यामध्ये निक जोनसचे आद्याक्षर (NJ) आणि प्रियंका चोप्रा जोनसचे (PCJ) अशी आद्याक्षर लिहिली आहेत.
प्रियंकाच्या या फोटोंमध्ये त्या दोघांची केमिस्ट्री दिसत आहे. या फोटोंमध्ये त्या दोघांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. प्रियंका - निक हनीमूनला जाण्याअगोदर मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशन करता उदयपुरमध्ये पोहोचले होते.