मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका ही नेहमीच तिच्या कामात व्यस्त असली तरी देखील ती कुटुंब आणि मुलगी मालती मेरीसाठी नक्कीच वेळ काढते. या रविवारी प्रियांकानं तिच्या लेकीसाठी पूर्ण वेळ काढला. मुलीची झलकही प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण यावेळी तिचं रक्षण कोण करत याचा खुलासाही प्रियांकानं केला आहे.
प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी प्रियांकानं मालतीचा आणि तिच्या तीन श्वानांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत प्रियांका म्हणाली, माझी सगळी मुलं एकत्र, उत्तम रविवार. त्यानंतर प्रियांकानं आणखी एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोत मावलतीच्या टी-शर्टवर माझे रक्षण हे डायना, गीनो आणि पांडा करतात असे लिहिले आहे. तर आणखी एक फोटो प्रियांकानं शेअर केला आहे यात मालती पुस्तक चाळताना दिसत आहे, तर प्रियांका म्हणाली रविवार हा वाचण्यासाठी असतो.
काही दिवसांपूर्वीच प्रियांकानं तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी समुद्रकिनारी पार्टी केली, यावेळी कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते.
दरम्यान, प्रियांकाचे अनेक प्रोजेक्ट्स हे लाइनअप आहेत. 'It's All Coming Back To Me' आणि 'Citadel' ही सीरिज आहे. तिच्याकडे एक बॉलीवूड चित्रपट देखील आहे, या चित्रपटाची निर्मिती ही फरहान अख्तर करत आहे. या चित्रपटाचे नाव 'जी ले जरा' असून यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका आहेत.