अंर्तवस्त्र न घालता प्रियंका चोप्रा पोहचली अवॉर्ड फंक्शनमध्ये, फोटो व्हायरल

प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Updated: Dec 16, 2021, 10:18 PM IST
अंर्तवस्त्र न घालता प्रियंका चोप्रा पोहचली अवॉर्ड फंक्शनमध्ये, फोटो व्हायरल title=

मुंबई : प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे. तिचा मॅट्रिक्स हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रियांका खूप व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री एकापेक्षा एक ड्रेस परिधान करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. पण कधी कधी प्रियांका खूपच प्रयोगशील बनते. एकदा प्रियंका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अंर्तवस्त्र न घालता पोहोचली होती.

अनकंफर्टेबल दिसली प्रियंका
बाफ्ता पुरस्कार एप्रिल २०२१ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकाने आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड ड्रेस परिधान केला होता. या फंक्शनमध्ये प्रियंकाला ज्यांनी कुणी पाहिलं ते तिला पाहतच राहिले असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या अभिनेत्रीला तिच्या पेहरावाचा प्रयोग चांगलाच जड गेला. या लूकमध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती. तिला तिचे जॅकेट पुन्हा पुन्हा सांभाळावं लागत होतं.

लोकांनी केलं ट्रोल
यावेळी प्रियांका चोप्राने पांढर्‍या रंगाची धोती पँट आणि   ब्लॅक फुटवियरमध्ये प्रियंका रेडी होती. त्याचबरोबर एंब्रायडरी केलेलं जॅकेटचा फ्रंट पोर्शन वरुन काही बटन पुर्णपणे ओपन होता...ही फॅशन खूपच धोकादायक होती. पण या लूकमध्येही प्रियांका अप्रतिम दिसत होती आणि तिने ही हाय-फाय फॅशन पूर्ण आत्मविश्वासाने कॅरी केली. प्रियांका सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करताच टोलर्सने तिच्यावर निशाणा साधला आणि तीव्र प्रतिक्रीया दिल्या.