"निक रात्रभर झोपू देत नाही", प्रियांकाकडून नवऱ्यासंदर्भात मोठं रहस्य उघड

अनेक रात्री अशा गेल्या जेव्हा प्रियांका चोप्रा अनेक तास झोपू शकत नाही आणि याचे कारण आहे निक जोनासचा मधुमेह.

Updated: Nov 1, 2021, 03:20 PM IST
"निक रात्रभर झोपू देत नाही", प्रियांकाकडून नवऱ्यासंदर्भात मोठं रहस्य उघड title=

लंडन : बॉलीवूडची देसी गर्ल म्हटल्या जाणार्‍या प्रियांका निक जोनासने एका मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले आहेत की, तिचा पती निक जोनासमुळे तिला रात्रभर झोप येत नाही. आज आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी जोडीबद्दल बोलायचे तर, एक जोडपे नेहमीच चर्चेत असते आणि ते म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास. दोघांची जोडी स्वतःमध्ये खूप क्यूट आहे. आता लोकांना प्रश्न पडतो की, हे सर्व कसे घडले? त्यामुळे जेव्हा प्रियांका अमेरिकेत काम करत होती तेव्हा दोघेही प्रेमात पडले आणि नंतर दोघे एक झाले.

आता लग्नानंतर दोघेही एकत्र राहत आहेत पण तुम्हाला माहित आहे का की लग्नानंतर अनेक रात्री अशा गेल्या जेव्हा प्रियांका चोप्रा अनेक तास झोपू शकत नाही आणि याचे कारण आहे निक जोनासचा मधुमेह. निकला आतापासून नाही तर बऱ्याच दिवसांपासून मधुमेहाचा त्रास आहे, त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो.

निक त्याच्या आरोग्याबाबत खूप संवेदनशील आहे आणि याच कारणास्तव निक जोनासला देखील रात्रीच्या वेळी माहित असते की, त्याची साखर किती टिकते, तो खूप संवेदनशील आहे आणि यामुळे प्रियांकाला रात्री उठून सर्व काही ठीक आहे की नाही हे तपासावे लागते.

आता तुम्ही म्हणाल की, हे बरोबर आहे बायकोने नवऱ्याची काळजी घ्यावी हे सहाजीकच आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की अमेरीकेत बायकोने नवऱ्याची काळजी घेणे हे बायकोचे कर्तव्य असल्याचे मानले जात नाही.

जर कोणाला हे करायचे असेल तर, ते मनापासून ते करु शतात. प्रियंकाही मुळची भारतीय असल्याने ती ही गोष्टी निकच्या प्रमासाठी करत आहे आणि आपल्या नवऱ्याची काळजी घेत आहे. निकच्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या, पण त्याला पहिल्यांदाच प्रियंकासारखी मुलगी मिळाली आहे जी त्याची इतकी काळजी घेते.