Priyanka Chopra ने लेकीचा चेहरा दाखवलाच? सर्वत्र फोटोची चर्चा

इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पहिल्यांदा लेकीचा चेहरा दाखवला आहे. प्रियांकाची लेक अत्यंत गोड; गुटगुटीत गाल आणि छोटेसे हात...  

Updated: Nov 23, 2022, 12:16 PM IST
Priyanka Chopra ने लेकीचा चेहरा दाखवलाच? सर्वत्र फोटोची चर्चा title=
Priyanka Chopra Daughter First Photo Face Reveal: सध्या झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आज भारतातीलच नाहीतर परदेशातील देखील प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. लग्नानंतर प्रियांका तब्बल तीन वर्षांनी भारतात आहे. अमेरिकन गायक निक जोनससोबत (priyanka chopra nick jonas) लग्न केल्यानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली. सोशल मीडियावर देखील प्रियांका तुफान चर्चेत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रियांका फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता अभिनेत्रीने लेकीसोबत एक खास फोटो शेअर केला आहे.
 
इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पहिल्यांदा लेकीचा चेहरा दाखवला आहे. फोटोमध्ये प्रियांकाच्या मुलीचे गुटगुटीत गाल छोटेसे हात प्रचंड सुंदर दिसत आहेत. फोटो स्टोरीवर करत तिने कॅप्शनमध्ये, 'I mean..' असं लिहिलं आहे. आता देखील प्रियांकाने लेकीचा पूर्ण चेहरा दाखवला नसला तरी फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (priyanka chopra daughter story)

priyanka

 
बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका ही नेहमीच तिच्या कामात व्यस्त असली तरी देखील ती कुटुंब आणि मुलगी मालती मेरीसाठी नक्कीच वेळ काढते.
 
प्रियांका सध्या मुंबईत आहे. तीन वर्षांनंतर मुंबईत आल्यानंतर अभिनेत्री अनेक ठिकाणी भेट देत आहे. शिवाय अनेक ठिकाणी तिला स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाहीतर, खुद्द प्रियांकाने देखील काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (priyanka chopra daughter)
 
प्रियांका चोप्रा पुढील प्रोजेक्टमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत फरहान अख्तरच्या आगामी चित्रपट झी ले जरा मध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे सिटाडेल ही वेब सिरीज देखील आहे, ज्याची निर्मिती दिग्दर्शक-अँथनी रुसो आणि रुसो यांनी केली आहे. प्रियांका हॉलिवूड चित्रपट लव्ह अगेनमध्येही दिसणार आहे.