'माझा नवरा मला मारेल' असं नेमकं का म्हणाली प्रियांका चोप्रा?

प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असते.

Updated: Nov 10, 2021, 04:28 PM IST
'माझा नवरा मला मारेल' असं नेमकं का म्हणाली प्रियांका चोप्रा?  title=

मुंबई : प्रियांका चोप्रा तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे खूप चर्चेत असते. तिचे प्रत्येक लूक आणि ज्वेलरी नेहमीच आकर्षिक असतात. आता नुकतंच प्रियांकाला तिच्या आवडत्या ज्वेलरीबद्दल विचारलं असता यांवर ती म्हणाली की, जर मी माझ्या एंगेजमेंटची अंगठी नाही सांगितली तर माझा नवरा मला मारून टाकेल. यापुढे ती हसत म्हणते मी विनोद करत आहे

प्रियांका पुढे म्हणते, खरं तर माझी अंगठी माझ्यासाठी खास आहे. त्याच्याशी माझ्या खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ती माझ्यासाठी नेहमीच खास असेल. मी सुद्धा त्याबद्दल खूप भावनिक आहे. या अंगठीबद्दल निकने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याला वडिलांशी जोडलेली अंगठी हवी होती. ती अंगठी टिफनीचीच असावी हे त्यावेळी मला माहीत होतं. मी माझ्या दोन भावांची मदत घेतली आणि अंगठी निवडली. एका रिपोर्टरनुसार प्रियांकाच्या अंगठीची किंमत 2 कोटींहून अधिक आहे.

प्रियांका आणि निक यांनी 2018 साली जोधपूरमध्ये ख्रिश्चन आणि हिंदी रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. यानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत ग्रँड रिसेप्शन ठेवलं. प्रियांकाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती हॉलिवूड चित्रपट मॅट्रिक्स आणि बॉलीवूड चित्रपट 'जी ले जरा'मध्ये दिसणार आहे. 'जी ले जरा'मध्ये प्रियंकासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.