देसी गर्लने शेअर केले होणाऱ्या वहिनीचे फोटो

प्रियंकाने सिद्धार्थ चोप्रा आणि इशिताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Updated: Feb 28, 2019, 10:13 AM IST
देसी गर्लने शेअर केले होणाऱ्या वहिनीचे फोटो

नवी दिल्ली : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा भारतात आली असून सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करताना दिसतेय. लग्नानंतर पहिल्यांदाच प्रियंका आणि निक भारतात आले आहेत. पण प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केल्यानंतर तिचं भारतात येण्याचं कारण समोर आलं आहे. प्रियंकाने इन्स्टाग्रामवरून तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि वहिनीचा फोटो शेअर केला आहे. प्रियंका आणि निक सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी भारतात आले आहेत. सिद्धार्थचा रोका झाल्यानंतर या कार्यक्रमाचे फोटो प्रियंकाने शेअर केले आहेत. 

प्रियंकाने सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंकाने तिच्या वहिनीचे स्वागत करत दोघांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.  

सिद्धार्थ आणि इशिता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक वेळा इशिताला प्रियंकाच्या कुटुंबियांसोबत फोटो शेअर करताना पाहण्यात आलं आहे. इशिता आणि सिद्धार्थ सोशल मीडियावरून त्यांचे फोटो शेअर करत असतात. आता हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रियंकाने निक आणि तिचा फोटो शेअर करत भारतात सांगितलं. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका भारतात आली आहे. सिद्धार्थच्या रोका कार्यक्रमातील तिचे आणि निकचे फोटोही प्रियंकाने शेअर केले आहेत. 

 
 
 
 

A post shared by Ishita Kumar (@ishittaakumar) on

 
 
 
 

A post shared by Ishita Kumar (@ishittaakumar) on

पति निक जोनस के साथ दिल्ली पहुंचीं प्रियंका चोपड़ा, शेयर की PHOTO

प्रियंका चोप्रा लवकरच 'द स्काय इज पिंक'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाआधी प्रियंकाने बॉलिवूडमध्ये रणवीर आणि दीपिकासोबत 'बाजीराव मस्तानी'मध्ये काशीबाईची भूमिका साकारली होती.