Priyanka Chopra Video : प्रियांका चोप्राची बिघडली विमानातच प्रकृती; अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावरही धुमाकूळ घातल आहे. 

Updated: Oct 17, 2022, 07:55 PM IST
Priyanka Chopra Video : प्रियांका चोप्राची बिघडली विमानातच प्रकृती; अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर

मुंबई : ग्लोबल आयकॉन बनून तरुणांना प्रेरणा देणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच अभिनेत्री तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर करून चर्चेत आली आहे. या क्लिपमध्ये प्रियांका फ्लाइटच्या आतून बाहेरचे दृश्य दाखवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये घाबरताना दिसली अभिनेत्री
प्रियांका चोप्राच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विमानाबाहेर चालू असणाऱ्या फॅनला पाहून ती घाबरत आहे. व्हिडिओमध्ये, प्रियांका चोप्रा कधी खिडकीबाहेरचं दृश्य दाखवत आहे. तर कधी ती स्वतःचा चेहरा दाखवतेय तर कधी टीम सदस्यांना कॅप्चर करताना दिसत आहे. त्याचबरोबर विमानाबाहेर धावणारा पंखा पाहून प्रियंका चोप्राच्या चेहऱ्यावरील भिती स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी प्रियांकाने चेहऱ्यावर मास्क घातला आहे. मात्र तिचे डोळे सगळं काही सांगत आहेत.
 
फ्लाइटमध्ये प्रवास करताना घाबरली प्रियांका
इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा प्रवास व्हिडिओ शेअर करताना प्रियंका चोप्राने लिहिलं आहे की,  #fearofflying' म्हणजे देसी मुलगी फ्लाइटमध्ये प्रवास करण्यास घाबरते. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला असून चाहत्यांना तो चांगलाच आवडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांका चोप्रा लवकरच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय प्रियांका तिच्या 'सिटाडेल' या वेब सीरिजसाठीही प्रचंड लाइमलाइटमध्ये आहे.