प्रियंका चोप्राने रस्त्यावर केलं असं काही की....

पाहा असं काय केलं 

प्रियंका चोप्राने रस्त्यावर केलं असं काही की....

मुंबई : देसी गर्ल प्रियंका चोप्रा हॉलिवूड सिनेमा 'इजन्ट इट रोमँटिक' या सिनेमांत दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बी टाऊन गर्ल प्रियंका रोमँटिक मूडमध्ये थिरकताना दिसत आहे. शुटिंगचे काही फोटो प्रियंकाने ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये प्रियंकाचे को-स्टार्स लियाम हेम्सवर्थ, रिबेल विल्सन आणि एडम डेवाइनसोबत न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल स्टेशनजवळ थिरकताना दिसली. 

दुसरा हॉलिवूड सिनेमा 

'इजन्ट इट रोमँटिक' ही प्रियंका चोप्राची दुसरी हॉलिवूड मुव्ही आहे. याअगोदर ती 'बेवॉच'मध्ये दिसली होती. तसेच हॉलिवूडच्या 'क्वांटिको' या टीव्ही सिरीजमध्ये देखील ती दिसली होती. टॉड स्ट्रॉस शुल्सन दिग्दर्शित 'इजन्ट इट रोमांटिक' ही एक अमेरिकन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. प्रियंका चोप्रा, रिबेल विल्सन, एडम डेवाइन आणि बेट्टी गिलपिन स्टारर हा सिनेमा 14 फेब्रुवारी 2019 मध्ये व्हॅलेंटाइन डेवर रिलीज होणार आहे. 

 

Bolly style dancin in NYC  Glimpses of Priyanka Chopra shooting for her upcoming Hollywood movie near Grand Central station in the Big Apple yesterday  FOLLOW  @voompla INQUIRIES  @ppbakshi . #voompla #bollywood #priyankachopra #bollywoodstyle #bollywoodfashion #bollywoodactress #mumbaidaily #mumbaidiaries #mumbaiscenes #mumbai #delhidiaries #delhiscenes #delhidaily #desigirl #indianactress #bollywoodactresses #bollywoodstylefile

A post shared by Voompla (@voompla) on

बी टाऊनची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनसची देखील आजकाल चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या दोघांची खूप चर्चा होत आहे. प्रियंका नुकतीच आपली आई मधु चोप्राला जोनसची भेट करून दिली. 25 वर्षाचा निक जोनास अमेरिकन सिंह आणि साँग रायटर आहे. प्रियंका त्याच्यापेक्षा जवळपास 10 वर्षाने मोठी आहे. प्रियंकाची ओळख निकसोबत एका मेट गालामध्ये झाली होती.