सनी लिओनीच्या बायोपिकमधून 'हा' शब्द हटवण्याची मागणी

होतोय विरोध

सनी लिओनीच्या बायोपिकमधून 'हा' शब्द हटवण्याची मागणी  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची बायोपिक 'करणजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' रिलीज झाली आहे. सनीच्या इस बायोपिकचा पहिल्या सिझनच प्रिमिअर 16 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या वेब सिरीजचे प्रसारण Zee5 मध्ये केलं जाणार आहे. सध्या ही बायोपिक जोरदार चर्चेत आहे. यामध्ये सनीचा पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. 

दिल्लीच्या सिख गुरूद्वारा प्रबंधन समितीने सनी लिओनीच्या बायोपिकला विरोध केला आहे. सनी लिओनीच्या बायोपिकने नाव 'करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' आहे. यातील 'कौर' या शब्दाला कडाडून विरोध केला आहे. डीएसजीएमसीचे महासचिव मंजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले आहे की, 'कौर' हे उपनाम असून याचा उपयोग सिख मुली आणि महिला करतात. त्यांनी ट्विट करून सोशल मीडियावर ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

सिरसा म्हणाले की, प्रमोशनकरता हा स्टंट समजला जात आहे. एका प्रसिद्ध व्यक्तीच्या अश्लिल जीवनपटाला कौर हा शब्द वापरण सिखांसाठी अपमानकारक आहे. कौर या शब्दाचा वापर साध्या गोष्टीच्या प्रमोशनकरता करू शकत नाही. सिरसा यांनी चेतावणी दिली आहे की, जर प्रोड्यूसरने या बायोपिकमधून कौर हा शब्द हटवला नाही तर कठोर कारवाई करावी लागेल. सिरसा यांनी झी समुहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र यांना पत्र लिहून हा शब्द हटवण्याची मागणी केली आहे.