मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या साखरपुड्याला 5 दिवस झाले आहेत. या कार्यक्रमानंतर दोघांचे असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. रोखा करतानाच्या फोटोंसोबत पार्टीचे फोटो देखील समोर आले. आता प्रियंका आणि निकच्या लग्नाबाबतच्या सगळ्यागोष्टी हळूहळू समोर येत आहेत. अगदी त्यांच लग्न कधी आणि कुठे
प्रियंका चोप्राने रोका समारंभ घरी तर पार्टी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये ठेवली होती. या पार्टीत कलाकार आणि अनेक बिझनेसमन उपस्थित होते. तर प्रियंकाचे अनेक नातेवाईक देखील सहभागी होते. काही लोकं तर अगदी बरेलीवरून या समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. याबाबत लीडिंल लेडीने बोलताना सांगितलं की, प्रियंका रोकाच्या कार्यक्रमात अतिशय सुंदर दिसत होती. आम्ही प्रियंकाच्या घरी निक जोनसच्या कुटुंबासोबत देखील वेळ घालवला. तेव्हा त्यांनी बरेलीशी जोडलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या.
राजची पत्नी उर्वशीने सांगितलं की, निक याचे पालक देखील धार्मिक आहेत. ते रोका आणि पूजा करण्यासाठी लगेच तयारी दाखवली. यावेळी त्यांनी पारंपरिक वेश परिधान केला होता. यावेळी निकचे वडील केविन यांनी एक कविता देखील सादर केली. यानंतर प्रियंका आणि निकने देसी गर्ल गाण्यावर डान्स देखील केला. तसेच प्रियंकाचं लग्न हवाईमध्ये होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.