बापरे इतक्या संपत्तीचे मालक आहेत बच्चन कुटूंबीय! जया बच्चन यांच्या मालमत्तेचा कच्चा चिठ्ठा सगळ्यांसमोर

जया बच्चन या कायमच चर्चेचा विषय असतात. आता पुन्हा एकदा जया बच्चन चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी जया बच्चन यांच्या सपत्ती विषयी बोललं जात आहे. 

Updated: Feb 14, 2024, 01:17 PM IST
बापरे इतक्या संपत्तीचे मालक आहेत बच्चन कुटूंबीय! जया बच्चन यांच्या मालमत्तेचा कच्चा चिठ्ठा सगळ्यांसमोर title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्यावर्षी त्यांनी २७३ करोड रुपये कमावले. याचा खुलासा राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जात दिलेल्या एफिडेबिटमधून झाला आहे. राज्यसभा निवडणूकीमध्ये समाजवादी पार्टीने जया बच्चन यांना पुन्हा एकदा उमेदवार बनवलं आहे. उमेदवारी अर्जातून जया बच्चन यांच्यासोबतच त्यांचे पती अमिताभ बच्चन यांची कमाईदेखील समोर आली आहे. यानुसार बच्चन कुटूंबाकडे 800.49 करोडची रोख मालमत्ता आहे. तर 200.14 करोडची स्थावर मालमत्ता आहे. दोन्ही मिळून जवळपास एक हजार करोडची संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे जवळपास 12.75 लाख रुपये आणि जया बच्चन यांच्याकडे 57 हजार रुपये इतकी रोकड आहे. 

प्रतिज्ञापत्रानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये अमिताभ बच्चन यांची कमाई  273.74 करोड, 2020-21 मध्ये 226.30 करोड, 2019-20 मध्ये 152.19 करोड रुपये आणि 2018-19 मध्ये 193.66 करोड रुपये इतकी होती. अमिताभ बच्चन यांच्याकडे 12.75 लाख रुपये  इतकी रोकड आहे. अमिताभ बच्चनयांच्या नावे 17 करोड 66 लाख रुपयेपेक्षा जास्त लग्जरी कार आणि 54 करोड 77 लाखची ज्वेलरी आहे. तर त्यांनी  120 करोड पेक्षा जास्त एफडी केली आहे तर अमिताभ यांच्याकडे १८२ करोड पेक्षा जास्त बँक बॉन्ड आहे. बॉलिवूडचे शहनशाहने  359 करोडचं कर्जही इतरांना दिलं आहे.

तर त्यांच्यावर सध्या 17.06 करोडच कर्जही आहे. रिपोर्टनुसार, अमिताभ यांच्याकडे प्रतिक्षा आणि जलसामिळून चार बंगले आहेत. नुकतीच त्यांनी अयोध्यामध्येही संपत्ती खरेदी केली आहे. त्यांच्याकडे मर्सीडीज बेंच, लँड क्रूजर आणि लेक्‍सससारख्या गाड्या आहेत. 

यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टी नेत्या जया बच्चन यांची कमाई आणि संपत्तीच्या तपशीलानुसार, त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 1.63 कोटी रुपये कमावले होते. जे की, पाच वर्षाआधी म्हणजे 2018-19 मध्ये त्यांची कमाई  25.54 लाख रुपये इतकी होती. त्यांच्याकडे 57,507 रुपये रोकड आहे. जया बच्चन यांच्याकडे 9.82 लाख रुपयांची मोटर व्हीकलदेखील आहे. त्यांच्याकडे ४० करोड 97 लाख रुपयांपेक्षा जास्त ज्वेलरीदेखील आहे. याशिवाय त्यांच्याकडे १०.११ करोडची एफडी आणि  5.18 करोडचा बँक बॉन्ड आहे. । 29.79 करोडचं कर्ज जया बच्चन यांनी दिलं आहे आहे तर जया बच्चन यांच्यावर  88.12 करोडचं कर्ज आहे.