मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असणाऱ्या 'पुष्पा- द राईज' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिली केली आहे. दाक्षिणात्य चाहत्यांनी या चित्रपटाला दमदार प्रतिसाद दिलाच. मात्र चित्रपटाच्या हिंदी वर्जनने देखील कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडले. सध्या या सिनेमाा सगळीकडेच बोलबाला आहे. हा सिनेमा मल्याळम, कन्नड, तेलुगू, तिमिळ आणि हिंदी सिनेमात प्रदर्शित झाला आणि या पाचही भांषांमध्ये हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातले डायलॉग आणि गाणी सुपरहिट ठरली. पण तुम्हाला आज आम्ही या सिनेमातील पाच चुका सांगणार आहोत.
सिनेमात एक सीन दाखवण्यात आला आहे तो सीन म्हणजे, जेव्हा पुष्पा श्रीनूचा मेहुणा मोगलीसला पाण्यात मारतो तेव्हा नदीत मोठमोठे दगड असतात आणि तरही तो पाण्यात बाईक चालवतो. जे खरंतर अत्यंत चुकीचं आहे. अल्लू अर्जूननेही स्टंटच्या नादात विज्ञानाचा धुरळा उडवला आहे.
आता आपण त्या सीनबद्दल बोलणार आहोत ज्यात पुष्पा पोलिसांपासून सुटताना ट्रकला उडवून खड्डात टाकतो. पुष्पा ज्या खड्डांत ट्रक टाकतो तो खड्डा रस्त्याच्या अगदी बाजूलाच आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला एवढा मोठा खड्डा पोलिसांना दिसला नाही का? बरं असं मानूयात की पोलिसांना ते खड्डे दिसले नसतीलही. पण तो रस्ता कच्चा होता आणि कच्च्या रस्त्यावर ट्रकच्या टायरच्या खुणा असणं सामान्यच आहे. पण ज्या पोलिसांनी पुष्पाला पकडलं ते ट्रक शोधण्याचा प्रयत्नही करत नाहीत त्याला थेट गाडीपर्यंत घेऊन जातात.
पुष्पाची सर्वात मोठी चूक म्हणजे, त्या सीनमध्ये जिथे पुष्पा लाल चंदनाच्या काड्या पाण्यात टाकतो. ज्यावर संपूर्ण स्टोरी आधारित आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाल चंदानाची किंमत करोडो रुपये आहे. लाल चंदन हे असं लाकूड आहे ज्याचा तुकडा पाण्यात बुडवला जातो. त्याचा दर्जाही तसाच ओळखला जातो पण सिनेमात मात्र लाकूड पाण्यात तरंगत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सिनेमात दाखवण्यात आलेलं लाकूड फायबर किंवा फोमचं वापरण्यात आलं असावं.
सिनेमात दाखवण्यात आलयं की, पुष्पाचा खास मित्र केशवला आधी व्हॅनचा दरवाजाही उघडता येत नसतो. मात्र नंतरच्या सीनमध्ये तो नवीन मारुती व्हॅन चालवताना दिसतोय. आता तुम्हीच विचार करा की, ज्याला गाडीचा दरवाजा उघडता येत नाही तो गाडी कशी चालवू शकतो. खरंतर यात काहीच तथ्य नाहीये.
सिनेमातील एका सीनमध्ये ड्राईव्हर विना ट्रक चालताना दिसत आहे हा सीन म्हणजे, ज्यात पुष्पा ट्रकच्या बोनेटवर बसून धुमाकूळ घालताना दिसत आहे. आणि या दरम्यान हा ट्रक फिरत आहे. पण तुम्हीच विचार करा की, जर गाडीत ड्राईव्हर नाही तर ट्रक कसा चालू शकतो?