अल्लु अर्जुनच्या 'या' निर्णयामुळे पुष्पा कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नसता, कारण...

अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत पुष्पा या चित्रपटाशी संबंधित अनेक गुपिते उघड केले. 

Updated: Feb 2, 2022, 12:40 PM IST
अल्लु अर्जुनच्या 'या' निर्णयामुळे पुष्पा कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नसता, कारण... title=

मुंबई : पुष्पा सिनामाचा क्रेझ इतका वाढला आहे की, ते उतरण्याचे नाव घेत नाही. जिथे पाहावे तिथे लोकं त्याच्या स्टाईलची आणि डान्सची कॉपी करताना पाहायला मिळत आहेत. अल्लू अर्जुनच्या स्टाईलपासून ते रश्मिका मंदान्नाचा निरागसपणा आणि समांथाच्या सेक्सी मूव्ह्स सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत असतात. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी त्याची चर्चा अजूनही कायम आहे. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर अल्लू अर्जुनने प्रेक्षकांच्या मागणीनंतर चित्रपटाशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे.

अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत पुष्पा या चित्रपटाशी संबंधित अनेक गुपिते उघड केले. अल्लु अर्जुन म्हणाला, "टीव्हीचे टीआरपी आकडे पाहूनच आम्ही पुष्पाला इतर भाषांमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला. यूट्यूबवर बनवलेल्या रेकॉर्डमुळे आमच्या निर्णयाला बळ मिळाले. देशात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटाचा विक्रम अला वैकुंठापुरमुलूच्या नावावर आहे आणि तोही दोनदा. मला वाटले की लोकांना मला बघायचे आहे."

पुढे अल्लू अर्जुन म्हणाला - "चांगला चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता. मला खात्री होती की प्रेक्षक नक्कीच मला सिनेमागृहात पाहायला येतील आणि लोकांनी माझ्यावरचा हा विश्वास कायम ठेवला. लोकांचे माझ्यावरील प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते. लोकांमध्ये माझ्याबद्दल एक उत्साह होता. जो दिसून आला. "

पुष्पाच्या धडाकेबाज स्टाईलने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. पुष्पा: द राइज आजकाल भरपूर कमाई करून साऊथ सिनेमाचे सर्व रेकॉर्ड तोडण्यात व्यस्त आहे.