'क्वीन' चित्रपटाचा चार भाषांमध्ये होणार रिमेक

'क्वीन' चित्रपटाने कंगनाचे रिल लाईफ़ आणि रिअल लाईफ आयुष्यातही अनेक बदल झाले.

Updated: Nov 6, 2017, 01:30 PM IST
'क्वीन' चित्रपटाचा चार भाषांमध्ये होणार रिमेक  title=

 मुंबई : 'क्वीन' चित्रपटाने कंगनाचे रिल लाईफ़ आणि रिअल लाईफ आयुष्यातही अनेक बदल झाले.

'क्विन' चित्रपटाने कंगनाला नॅशनल अवॉर्ड मिळवून दिला. सोबतच तिला 'क्वीन' ही नवी ओळख मिळाली आहे. या चित्रपटाचं बॉक्सऑफिसवरील दमदार यश पाहता या चित्रपटाचा भरातामध्येच चार विविध भाषांमध्ये रिमेक होणार आहे. 

 बॉलिवूडलाईफ.कॉम या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात चार विविध भाषांमध्ये या चित्रपटाचा रिमेक होणार आहे. त्यामध्ये चार विविध अभिनेत्री काम करणार आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, मंजिमा मोहन आणि पारूल यादव काम करणार आहेत. यासोबतच 'लिसा हेडेन' या बेस्ट फ्रेंडच्या भूमिकेसाठी काही अभिनेत्रींची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत.अभिनेत्री  शिबानी दांडेकर हे पात्र तेलगू आणि मल्याळममध्ये साकारणार आहे. तर तमिळ आणि कन्नड भाषेत एली एवराम काम करणार आहे. 

 'क्वीन' चित्रपटाची कहानी एका २४ वर्षीत तरूण मुलीची आहे. ती एका रूढीवादी घरात लहानाची मोठी होते. तिचं लग्न मोडतं, त्यानंतर ती एकटीच युरोपमध्ये हनिमुनला जाते. तेथे तिला स्वतःच्या क्षमतेचा अंदाज येतो. युरोपामध्ये तिचे काही मित्र बनतात. पुढे ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहते हे पाहणं चित्रपटात फारच रोमांचित करणारं आहे.