'रँचो'पाठोपाठ 'फरहान'लाही कोरोना....3 IDIOTS चा संदर्भ देत केलं भन्नाट ट्विट

३ इडियट्स हा चित्रपट जितका हिट झाला, तितकीच आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी या अभिनेत्यांच्या जोडीनेही फॅन्सच्या मनावर जादू केली. कालच आमिर खानची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आज आर माधवनची. 

Updated: Mar 25, 2021, 04:12 PM IST
'रँचो'पाठोपाठ 'फरहान'लाही कोरोना....3 IDIOTS चा संदर्भ देत केलं भन्नाट ट्विट

मुंबई : ३ इडियट्स हा चित्रपट जितका हिट झाला, तितकीच आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी या अभिनेत्यांच्या जोडीनेही फॅन्सच्या मनावर जादू केली. कालच आमिर खानची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आज आर माधवनची. 

याचीच संधी साधत अभिनेता आर. माधवनने एक मजेशीर ट्विट केले आहे. ३ इडियट्समधील फोटो शेअर करत आर.माधवनने म्हटले आहे की, फरहानने तर रँचोच्या पावलावर पाऊल ठेवलेच पाहिजे. आणि व्हायरस (३ इडियट्समध्ये प्राध्यापक बोमन इराणी, पण इथे कोरोना व्हायरसचा संदर्भ)तर कायमच आपल्या मागे लागलेला असायचा. पण यावेळेला त्याने आपल्याला गाठलेच. पण All Is Well आहे. आणि कोरोना बराही होईल. 

अर्थात ही अशी गोष्ट आहे, ज्यात नक्कीच आपल्याला राजू नको आहे. 

 

३ इडियट्समधील भूमिका आणि आताची कोरोना स्थिती जुळवत आर. माधवनने हे मजेशीर ट्विट केले आहे. नेटकऱ्यांनीही त्याच्या क्रिएटीव्हीटीला दाद दिली आहे. तसेच आर माधवन आणि आमिर खान दोघेही लवकर बरे व्हावेत, अशी इच्छाही फॅन्सनी व्यक्त केली आहे.