सुशांंत सिंंग राजपूतनंतर आता हा कलाकार 'नासा'त !

'चंदामामा दूर के' या चित्रपटातील भूमिकेसाठी सुशांत सिंग राजपूत मेहनत घेतोय याबाबतचे अनेक फोटो आणि माहिती पहायला मिळतेय. पण सुशांतच्या सोबतच आता या चित्रपटातील त्याचा सहकलाकार आर माधवनही 'नासा'मध्ये पोहचला आहे.  

Updated: Aug 24, 2017, 10:15 AM IST
सुशांंत सिंंग राजपूतनंतर आता हा कलाकार 'नासा'त !
bollywoodlife

मुंबई : 'चंदामामा दूर के' या चित्रपटातील भूमिकेसाठी सुशांत सिंग राजपूत मेहनत घेतोय याबाबतचे अनेक फोटो आणि माहिती पहायला मिळतेय. पण सुशांतच्या सोबतच आता या चित्रपटातील त्याचा सहकलाकार आर माधवनही 'नासा'मध्ये पोहचला आहे.  

सुशांत सिंग राजपूत 'चंदामामा दूर के' या चित्रपटात अंतराळवीराची भूमिका साकारत आहे. परंतू सुशांतच्या सोबतच आर माधवन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकारही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे 'नासात' त्यांचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे.

 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकताच माधवनचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये माधवन स्पेससूटविषयी माहिती घेताना दिसत आहे. नुकतेच सुशांत सिंग राजपूत याचे नासामधील चार दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. 

संजय पुरण सिंग चौहान दिग्दर्शित 'चंदामामा दूर के' या चित्रपटाच्या शूटिंगला सप्टेंबर महिन्यात सुरूवात होईल. मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि इंटरनॅशनल स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. पुढील वर्षी  २६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.