नवा विक्रम रचत माधवनच्या मुलाने केले देशाचे नाव उज्ज्वल...

बॉलिवूड स्टार किड्स नेहमी पार्टी आणि ग्लॅमरमुळे चर्चेत असतात.

Updated: Apr 10, 2018, 07:33 PM IST
नवा विक्रम रचत माधवनच्या मुलाने केले देशाचे नाव उज्ज्वल...

मुंबई : बॉलिवूड स्टार किड्स नेहमी पार्टी आणि ग्लॅमरमुळे चर्चेत असतात. पण या नियमाला छेद देत अभिनेता आर. माधवनच्या मुलाने एक नवा विक्रम केला आहे. माधवनचा १२ वर्षांचा मुलगा वेदांतने स्विमिंग चॅपियनशिपमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. याची माहिती खुद्द माधवनने व्हिडिओ आणि फोटोज इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करुन दिली. सोशल मीडियावर फॅन्सने याला चांगलीच पसंती दिली आणि सध्या हा स्टार किड ट्रेंडमध्ये आहे. 

हा केला पराक्रम

वेदांतने थायलॅंड एज ग्रुप स्विमिंग चॅपियनशिप २०१८ मध्ये १५०० मीटर फ्री स्टाईल कांस्यपदक जिंकून देशाने नाव रोशन केले. मुलाचा फोटो शेअर करताना आर. माधवनने लिहिले की, माझी पत्नी सरीता आणि माझ्यासाठी अभिमानाचा क्षण. वेदांतने थॉयलॅंडमध्ये झालेल्या इंटरनॅशनल स्विम मीटमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले. सर्वांच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद.

 

Proud moment for Sarita and I as Vedaant wins his first medal for India in an international swim meet in Thailand today. Thank you for all your blessings .

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

माधवन स्वतः  कोच

माधवनने स्वतः वेदांतला स्विमिंगचे धडे दिले आहेत. साला खडूस या सिनेमात माधवनने बॉक्सिंग कोचची भूमिका साकारली होती. ती भूमिका साकारताना मुलाचा कोच होण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि आपल्या रील रोलमधून बाहेर पडत त्याने वेदांतचा कोच होण्याचा निर्णय घेतला. वेदांतने राज्यस्तरावर अनेक स्विमिंग चॅपियनशिप जिंकल्या आहेत. आता ही इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून स्वतःचे कौशल्य सिद्ध केले आहे. 

आराम की कामाची तयारी?

काही दिवसांपूर्वी खांद्याची सर्जरी झाल्याने माधवन सध्या आराम करत आहे. तर दुसरीकडे त्याच्या वेब सिरीज ब्रीथच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.