मुंबई: आर. माधवन एका सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या सिनेमाचे दिग्दर्शन आर. माधवन करणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्या यशोगाथेवर सिनेमा आधारलेला आहे. सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' सिनेमा तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आर. माधवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आर. माधवनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमाच्या पाटीचा फोटो शेअर करुन कॅप्शन मध्ये मला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादची गरज असल्याचे म्हंटले आहे.
नंबी नारायणन हे इस्रोमधील एक शास्त्रज्ञ असून त्यांना १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सिनेमाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत होते. पण त्यांच्या इतर कामांमुळे दिग्दर्शकाचे काम सोडावे लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले.