राधिका आपटेने सांगितले कास्टिंग काउचचे किस्से

राधिका यावर बिनधास्त बोलते, पण कुणाचंही नाव लीक होणार नाही याची ती काळजी देखील घेते,  काही मुली याबाबतीत बळी पडल्या आहेत, पण मी कुणाचंही नाव घेणार नाही.

Updated: Jul 22, 2017, 02:48 PM IST
राधिका आपटेने सांगितले कास्टिंग काउचचे किस्से

मुंबई : राधिका आपटे आपल्या बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत राहते, पण कास्टिंग काउच सारख्या प्रकाराचा तिला कधी तरी सामना करावा लागला आहे, हे तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत उदाहरणासह सांगितलं आहे.

राधिका यावर बिनधास्त बोलते, पण कुणाचंही नाव लीक होणार नाही याची ती काळजी देखील घेते,  काही मुली याबाबतीत बळी पडल्या आहेत, पण मी कुणाचंही नाव घेणार नाही.

या बाबतीत मी फार नशीबवान असल्याचं राधिका म्हणते, एवढंच नाही, तर दाक्षिणात्य भागात एकदा मला अप्रत्यक्ष सेक्सबद्दल संकेत देण्यात आले होते, पण त्याचा माझ्यावर काहीही परीणाम झाला नाही, एका अभिनेत्याने मला हॉटेलात बोलावलं.

तिथे गेल्यानंतर तेथील दृश्य पाहिल्यावर मला त्याचा हेतू समजला, त्याने मला सेक्ससाठी भुलवण्याचा प्रयत्न देखील केला, पण मी तेथून निघून आले, त्यासाठी तो भांडला नाही, किंवा त्याने मला रूम बाहेर जाण्यासाठी थांबवले देखील नाही.

दुसरी घटना आणखी वेगळीच होती, राधिका म्हणते, मला बॉलीवूडमध्ये चित्रपट काढणाऱ्या व्यक्तीशी भेटवून द्यायचे ठरवण्यात आले, यानंतर त्या लोकांनी मात्र सरळ विचारलं, एखादी रात्र तुमची त्याच्यासोबत काढण्यास हरकत नसेल ना, त्यावर मला फार हसू आले, आणि तुम्ही फारच विनोदी आहात. मी नाही करू शकत, भाड में जाओ, असं मी म्हटलं.

एकंदरीत अभिनेत्री राधिकाने अशा गोष्टी मनावर घेतल्या नाहीत, कारण तिला त्या वाटेला जायचं नव्हतं, किंवा तशा प्रकारचं यश तिला नको होतं. बोल्डसिन देणाऱ्या राधिकाने सांगितलेले हे किस्से फारच वेगळे आहेत. राधिका बोल्डसिन देते, पण ते सिन भूमिकेची गरज असले पाहिजेत.