मातीने का माखली अभिनेत्री राधिका आपटे

राधिकाचा सध्याचा लूक अत्यंत थरारक दिसत आहे.

Updated: Feb 9, 2021, 05:25 PM IST
मातीने का माखली अभिनेत्री राधिका आपटे  title=

मुंबई : अभिनेत्री राधिका आपटे सतत स्वतःच्या सोशल मीडियावर वेग-वेगळे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. पण आता तिने शेअर केलेले फोटो काहीसे वेगळे आहेत. राधिकाचे हे फोटो पाहिले तर तुम्हाला प्रश्न पडेल  की, राधिका मातीने का माखली आहे. या फोटोंमध्ये ती मोठ्या अडचणीत आणि संकटात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राधिकाची अशी परिस्थिती का झाली असेल, असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे. 

दरम्यान राधिकाचा हा लूक तिच्या आगामी वेबसीरिजमधील आहे. तिचा सध्याचा लूक अत्यंत थरारक दिसत आहे. 'घोल' (Ghoul) वेबसीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक प्रतिक ग्राहमने आधिच याबद्दल संकेत दिले होते.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

आता राधिकाने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. राधिका या फोटोंमध्ये मातीने माखली आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शन देखील दिलं आहे. राधिका तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे अत्यंत खुश आहे. सोशल मीडियावरील तिचा हा फोटो सध्या तुफाण व्हायरल होत आहे. 

सांगायचं झालं तर 'घोल' (Ghoul) चा पहिला सीझन अनेकांच्या पसंतीस उतरला नाही. ज्य़ांना हॉरर सिनेमांत रस आहे त्यांनाचं फक्त ही वेबसीरिज आवडली. मात्र आता अरबी पौराणिक कथांद्वारे प्रेरित झाल्यावर दिग्दर्शक ग्राहमने सीरिजचं दिग्दर्शक केलं आहे.