Raha Kapoor Photo: गुलाबी ड्रेसमध्ये दिसली Ranbir आणि Alia ची राहा, नेटकऱ्यांनी कडाकडा बोटं मोडली!

Raha kapoor in pink dress: आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिची मुलगी राहा कपूरची सी-सेक्शन डिलिव्हरी पद्धतीने प्रसूती केली. राहा काही दिवसात तीन महिन्यांची होईल पण आजपर्यंत तिचा चेहरा कुणालाही दाखवलेला नाही.

Updated: Jan 26, 2023, 12:05 AM IST
Raha Kapoor Photo: गुलाबी ड्रेसमध्ये दिसली Ranbir आणि Alia ची राहा, नेटकऱ्यांनी कडाकडा बोटं मोडली! title=

Ranbir Alia Daughter: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी 14 एप्रिल रोजी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर कपूर कुटुंबातून आनंदाची बातमी समोर आली. आलियाने आणि रणबीरने एका गोंडस मुलीला (Raha Kapoor) जन्म दिला. अशातच आता रणबीर आणि आलियाच्या मुलीचा म्हणजेच राहा कपूरचा फोटो (Raha Kapoor Photo) समोर आलाय. (raha kapoor photo in pink dress viral ranbir alia daughter name face reveal baby kapoor sleeping in pram marathi news)

आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिची मुलगी राहा कपूरची सी-सेक्शन डिलिव्हरी पद्धतीने प्रसूती केली. राहा काही दिवसात तीन महिन्यांची होईल पण आजपर्यंत तिचा चेहरा कुणालाही दाखवलेला नाही. रणबीर आणि आलियाने राहासाठी नो फोटो पॉलिसी (No Photo Policy) ठेवली आहे, ज्यामुळे राहा दोन वर्षांची होईपर्यंत कोणीही फोटो काढू शकत नाही.

आणखी वाचा - लग्नाआधीच गर्भवती होती Alia Bhatt? डिलिव्हरीच्या तारीख समोर येताच मोठा खुलासा

असं असताना, सध्या राहाचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये गुलाबी ड्रेसमध्ये (raha kapoor in pink dress) दिसत आहे. काही दिवसांपूर्वीचा एक फोटो सध्या व्हायरल (Raha Photo Viral) होताना दिसतोय. रणबीर आणि आलिया त्यांच्या छोट्या परीसोबत फिरायला घराबाहेर पडल्यानंतर राहा कॅमेऱ्यात कैद झाली.

पाहा Photo -

दरम्यान, राहा कपूरचा चेहरा फोटोमध्ये दिसत नाही पण राहाचे पाय दिसत आहे. राहाने पांढरा आणि गुलाबी फुल स्लीव्ह टॉप घातलाय. एका कर्यक्रमात रणबीरने त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या राहाचा क्यूट फोटो फोटोग्राफर्सना दाखवला. रणबीरने राहाचा फोटो दाखवल्यानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी फोटोग्राफर्सना फोटो पब्लिक न करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी नो फोटो पॉलिसी कायम ठेवलीये.